शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी हेक्टरी ७.५० क्विंटलची उत्पादकता निश्‍चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

संदीप झाडे कुचना (चंद्रपूर) : यंदाच्या २०२०-२१ वार्षिक हंगामात हमीभावाने ५१०० रुपयांनी ६ लाख १७ हजार टन हरभरा खरेदीचे ...

संदीप झाडे

कुचना (चंद्रपूर) : यंदाच्या २०२०-२१ वार्षिक हंगामात हमीभावाने ५१०० रुपयांनी ६ लाख १७ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी निश्‍चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावर्षी बुलडाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक १५ क्विंटल ८२ किलो, रायगड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. काही जिल्ह्याची उत्पादकता कमी आली आहे, तर काही जिल्ह्याची उत्पादकता गतवर्षी एवढीच आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पीक उत्पादन होत असताना केवळ हेक्टरी ७.५० क्विंटलची मर्यादा राज्य शासनाने दिल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. पिकविलेले हरभरा पीक हमीभावाने कोण खरेदी करेल, या विवंचनेत शेतकरी पडला आहे.

या वर्षी गुलाबी बोंड अळीमुळे कापूस व सोयाबीन पिकामध्ये नुकसानीत आलेल्या शेतकऱ्याने हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. चांगले उत्पादन होत असून, काही ठिकाणी एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन झाले. मात्र, केंद्र शासनाने सरकारी खरेदीसाठी एकरी ३.२५ क्विंटलची मर्यादा टाकल्याने एवढे पीक विकायचे कसे, उरलेला माल हमीभावाने कोण खरेदी करणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बाजार समितीला

खासगी खरेदी करणारे व्यापारी ४३०० ते ४५०० रुपयेप्रमाणे चणा खरेदी करतात. त्यामुळे एका क्विंटल मागे शेतकऱ्यांचे ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत असल्याने हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापारावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने जिल्ह्यामधील चणा खरेदीतला अनुशेष वाढवून देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

करी सरासरी १० क्विंटल उत्पादन घेऊनही एकरी फक्त ३.२५ क्विंटल चना हमीभावाने शासन खरेदी करणार असेल तर बाकीचा चणा मग कवडीमोल भावाने विकायचा का? शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन घ्यायचे नाही का?

नरेंद्र जीवतोडे, अध्यक्ष किसान पुत्र गतशेती योजना, चंद्रपूर जिल्हा.

शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करायचे, पण ते हमीभावाने खरेदी करणार नसेल तर शेतकरी आत्मनिर्भर होणार कसा?

- गुड्डू एकरे ,

प्रगतशील शेतकरी, रा. पाटाळा, ता. भद्रावती.

जिल्हा कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगाच्या जुन्याच सांख्यिकी आकड्यांवर पाठविलेल्या अहवालानुसार मागील वर्षी राज्य शासनाने जी चना खरेदी मर्यादा ठरवलेली होती, तीच या वर्षीही कायम आहे.

- अनिल गोगीरवार, जिल्हा पणन अधिकारी, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. फेडरेशन, चंद्रपूर.