शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धानाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: September 13, 2015 00:53 IST

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासून मंदगतीने पाऊस सुरू झाला.

केवळ ७० टक्के रोवण्या : धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीचंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासून मंदगतीने पाऊस सुरू झाला. परिणामी जिल्ह्यात केवळ ७० टक्के रोवणी झाल्या आहे. मात्र रोवणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेण्यात येते, तर वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना या तालुक्यातील काही शेतकरी धानाचे पिक घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. हंगामाच्या सुरूवातीला झालेल्या पावसात पऱ्हे टाकण्यात आले. त्यानंतरही दरमदार पाऊस झाला नाही. अधून-मधून आलेल्या पावसाच्या भरवशावर रोवणी करण्यात आली. पऱ्ह्याची वाढ झाल्याने रोवणी केल्यानंतर पऱ्ह्यातील ताकद दिवसागणिक कमी झाली. रोवणी झाल्यानंतर दमदार पाऊस अपेक्षीत असताना पाऊस झाला नाही. उष्णता मा$$$$$$त्र वाढत असल्याने रोवणी झालेल्या धान पिकाची वाढ झाली नाही. त्याला फांदेही फुटले नाहीत. त्याचा परिणाम धानाच्या उत्पादनावर होणार आहे. रोवणीचा हंगाम निघून गेला. जिल्ह्यात ७० टक्के रोवणी झाली. पाऊसच नसल्याने उर्वरित ३० टक्के रोवणी होण्याची शक्यता आता मावळली आहे. रोवणी झालेल्या धान पिकात पावसाअभावी वाढण्याची ताकद नसल्याने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात धान पीक घटण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. (प्रतिनिधी)