शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानीनंतर वेकोलिकडून कार्यवाही

By admin | Updated: May 5, 2016 01:33 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत चिचोली नाल्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा फटका बसत होता.

तक्रारीनंतर खोलीकरण : अरुंद नाल्यामुळेच बॅकवॉटरचा फटकाबल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत चिचोली नाल्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा फटका बसत होता. गेल्या काही वर्षांपासून शेतीचेही नुकसान होत आहे. वारंवार वेकोलि व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वेकोलिने चिचोली गोवरी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीच हे काम केले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते. पिकांच्या नुकसानीनंतर वेकोलिला जाग आल्यामुळे नाला खोलीकरणाची प्रक्रिया सुरु केली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.बल्लारपूर वेकोलि अंतर्गत चिचोली नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलविण्यात आला होता. वेकोलि प्रबंधकांनी शासनास दाखविलेल्या नकाशाप्रमाणे नाल्यांची रुंदी ४० ते ५० मीटर ठेवायला पाहिजे होती. मात्र, तलाठ्याने केलेल्या मोका चौकशीनुसार नाल्याची रुंदी २७ ते ३० मीटर इतकीच दिसून आली. शिवाय मागील वर्षी नाल्यातील गाळ काढण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली. प्रत्यक्ष मोका चौकशीनंतर वेकोलिचे पितळ उघड पडले. शासकीय नियमाप्रमाणे नाला खोलीकरण करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेकोलि प्रशासनास पत्र दिले होते. प्रशासनाच्या दणक्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांची झोप उडाली. यावर्षी पावसाळ्यापूर्वीच चिंचोली- गोवरी नाल्याचे रुंदीकरण आणि गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.मागील वर्षी गोवरी नाल्याच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. मदतीसाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे धाव घेतली. मात्र, वेकोलिने कुठलीही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकरी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर शेतकऱ्यांचा समस्या ऐकून घेतल्या.वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष कुठलेच काम झाले नसल्याची माहिती पुढे आली. नाला वळविताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी नाल्याची रुंदी ४० ते ५० मीटर असणे आवश्यक आहे. वेकोलिने नाला खोलीकरणाचे काम करण्यापूर्वी मुख्य अभियंता जलसंधारण विभाग नागपूर यांच्याकडून परवानगीपत्र घेतले आहे. या पत्रात नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यानंतर परवानगी पत्रानुसार कामे झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शासनाने केलेल्या मोका चौकशीतही मोठी तफावत आढळून आली. (शहर प्रतिनिधी)