शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

बॅंकेअभावी नागरिकांना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST

स्वच्छता अभियानाचा उडाला फज्जा चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे. गावांमध्ये नाल्या, रस्ते, शौचालय आदी ...

स्वच्छता अभियानाचा उडाला फज्जा

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे. गावांमध्ये नाल्या, रस्ते, शौचालय आदी सुविधा उपलब्ध नाही. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकही उदासीन असल्याचे दिसते. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानाचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे, अशी मागणी होत आहे.

मच्छीनाल्याची स्वच्छता करावी

चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग कचरा टाकण्यासाठी होत असल्याने नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. महानगरपालिकेने नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्र आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी संचय करण्याची गरज

चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्या मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

मोबाइल दुरुस्तीसाठी गर्दी

चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाइल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे, याच स्टोरमध्ये अनेक कंपन्याचे मोबाइलचेही स्टोर असल्याने त्या कंपनीचे ग्राहकही गर्दी करतात. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एक एमआय स्टोर देण्यात यावे, अशी मागणी मोबाइल ग्राहकांकडून केली जात आहे.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांची अडचण

चंद्रपूर : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते. अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काही जण आठवीपासूनच तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून, भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे

चंद्रपूर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते, परंतु ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहितीही घेत नाही. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एकखिडकी योजना राबवावी

चंद्रपूर : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली, तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एकखिडकी ही योजना राबवून शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबविली होती. कोरोनाचा काळ असल्याने एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.