शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वाही नाला झाला प्रतिष्ठेचा प्रश्न

By admin | Updated: April 12, 2017 00:57 IST

देलनवाडी प्रभाग क्रं ४ मधील वाही नाल्यावर झालेले अतिक्रमण कुणी वाचविण्यासाठी तर कुणी नियमाप्रमाणे कायम राहण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून समोर आलेला आहे.

वाही नाला प्रकरण: नगरपरिषदेच्या सभेत प्रश्न ब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्रं ४ मधील वाही नाल्यावर झालेले अतिक्रमण कुणी वाचविण्यासाठी तर कुणी नियमाप्रमाणे कायम राहण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून समोर आलेला आहे.ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या सभेत नाल्याच्या अतिक्रमणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नालाच्या बांधकामाची निविदा विचारात न घेता काढण्यात आली आहे. त्यासाठी नगरपरिषदेने ९० लाख रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. पण नाला पूर्ण घेतलेला नाही. काही ठराविकच भाग बांधकामाकरिता घेतला आहे. या बांधकामाअंतर्गत सिटीसर्व्हेनुसार खरच अतिक्रमण काढण्यात येणार आहे काय? याचा खुलासा मात्र करण्यात आला नाही. अंदाजपत्रकात समावेश केल्याप्रमाणे बांधकाम करीत असताना नाल्याची एकूण रुंदी उपलब्ध करुनच काम करण्यात येणार आहे काय? तसेच बांधकामानंतर नाल्याच्या उर्वरीत रुंदीपैकी जागेचा वापर कश्यापद्धतीने व कशासाठी ठरणार असल्याचे काही नियोजन नाही. सदर नाल्याचे ठिकाणी लगतचे रिक्त क्षेत्रात सौंदर्यीकरण करता येत असेल तर त्याची तरतूद कुठेही करण्यात आली नाही. मग उर्वरीत जागेचा प्रश्न निर्माण होण्याची संभावना प्रशासनाने लक्षात घेतली नाही. याचाच अर्थ अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी मान्यता प्राप्त करुन देण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची चर्चा करण्यात येत आहे. बांधकामाव्यतिरिक्त उर्वरीत जागेचा क्षेत्रफळ अहवाल तयार करण्यात आला किंवा नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. सदर नाल्यातून पावसाळ्यात नाल्याचे आजूबाजूचे क्षेत्र तसे शारदा कॉलनी, गांधीनगर, हनुमाननगर, सुंदरनगर वखार महामंडळ परिसर, शेषनगर, गुरुदेव नगर तसेच बारई तलावाचे पाणी दरवर्षी वाहून जात होते. नाला पूर्णपणे अतिक्रमण झाल्याने बारई तलावाची पाण्याची वाढून पाळ फूटण्याचे प्रकार घडत आहे व शेषनगराच्या नागरीकांशी प्रशासन खेळ खेळत आहे. एवढेच नव्हे तर अनेक रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होत आहे. नाला नाल्यासारख्या असता तर हे दुदैवी प्रसंग उद्भवले नसते अशी चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)