शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१९ सप्टेंबरला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज महामेळावा

By admin | Updated: September 13, 2016 00:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक भूमिकेच्या संकल्पपूर्तीकरिता राष्ट्रीयकृत बँका...

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजनचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक भूमिकेच्या संकल्पपूर्तीकरिता राष्ट्रीयकृत बँका व जिल्ह्यातील विविध शासकीय संस्थांच्या सहभागातून प्रधानमंत्री मुद्रा योजनाअंतर्गत स्वयंरोजगाराकरिता कर्ज महामेळावा, मार्गदर्शन तथा चर्चासत्र सोमवार १९ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आले आहे.या कर्ज महामेळावा, मार्गदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ व वने मंत्री तथा जिल्ह्यातचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजीमंत्री संजय देवतळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे यांचेसह शासकीय अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य आदींची विशेष उपस्थिती लाभणार आहेत.प्रधानमंत्री मुद्रा कर्ज महामेळाव्यास विविध संस्था, उद्योजक संस्था व अन्य संस्थाद्वारे स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार असून मुद्रा कर्ज व अन्य शासकीय योजनांची माहिती बेरोजगार युवक, स्वयंरोजगार इच्छूक, पारंपारिक व्यवसायिक, बलुतेदार, कारागीर, लघु उद्योजक, शेतीपुरक व्यवसाय इच्छूक बांधवांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधीद्वारे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)