शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा

By admin | Updated: March 27, 2017 00:42 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

धान उत्पादकांची मागणी : राबराब राबूनही आर्थिक संकटनागभीड : धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.नागभीड तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानपिकावर या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. असे असले तरी या पिकाच्या संवर्धनासाठी सिंचनाच्या कोणत्याही सोयी या तालुक्यात नाहीत. जवळपास ९० टक्के शेती ही नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. नागभीड तालुक्यात घोडाझरी तलाव केवळ नावाला आहे. या तलावाचा बहुतांश फायदा सिंदेवाही तालुक्याला होत आहे. कसर्ला तलाव नागभीड तालुक्यात आहे. पण त्याची सिंचन मर्यादा मर्यादित आहे. नागभीड तालुक्यातील भातशेती सर्वार्थाने नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.या सर्व परिस्थितीवर मात करून नागभीड तालुक्यातील शेतकरी धानाचे पीक घेत आहे. परवडत नसले तरी कर्ज काढून या तालुक्यातील शेतकरी आपले परंपरागत कर्तव्य निभावत आहे. मात्र शेतकऱ्याच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शिरावर कर्जाचे डोंगर चढत आहेत.नागभीड तालुक्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे.सर्व संकटावर मात करून शेतकरी जे काही उत्पन्न घेतो आणि नंतर बाजारात त्याची विक्री करतो. तेव्हा त्याला जे भाव मिळते ते अतिशय कवडीमोल असते. गेल्या १० वर्षात मजुरीत, खताच्या किंमतीने दशपटीने वाढ झाली असली तरी धानाच्या किंमतीत झालेली वाढ अतिशय नगण्य आहे. आलेल्या उत्पन्नातून झालेला खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे. त्यामुळे धानाला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)