शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सीमावर्ती राज्यातून दारूची तस्करी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:18 IST

गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्करी रोखण्याचे निर्देश .......

ठळक मुद्देहंसराज अहीर : कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्करी रोखण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले.जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था संदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार निधीतून झालेल्या कामाचा आढावा घेत प्रलंबित असलेल्या कामाबाबत संबंधित विभागाला जाब विचारला. तर पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये वेगवेगळ्या कामांची सूचना केली. जिल्हाभरातील कामांमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये खासदार निधीचा खर्च अधिकाधिक होईल, याकडे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश दिले.दुपारी सांसद आदर्श ग्राम बैठक झाली. या बैठकीमध्ये विकास कामांमध्ये येणाºया अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व सिंचनाच्या संदर्भातील अडचणी दूर करावे. कृषी विभागाने बायोगॅस प्रकल्पाबाबत गतिशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना शेळीपालन व शेडसाठी निधी उपलब्ध करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली. दारूबंदी करण्यासाठी महिला बचतगट व विविध संघटनांनी मोलाचे योगदान दिले होते. पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पंरतु, अन्य राज्यातून तस्करी होवू शकते. त्यामुळे सीमावर्ती गावांतील नागरिकांचे सहकार्य घ्यावे, असेही ना. अहीर यांनी सांगितले. या बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ उपस्थित होते.पीक कर्ज वाटपात बँकांनी गती आणावीजूनचा पहिला आठवडा सुरू झाला असतानादेखील खरिपासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज शेतकºयांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. हे अपयश बँकांचे आहे. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात यासंदर्भातील प्रक्रियेमध्ये गती आणा, या शब्दात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवीद्र शिवदास, शिखर बॅकेचे एस.एन. झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आणि टंचाईचे नियोजन, विविध योजना व प्रधानमंत्री खनिज विकास निधीअंतर्गत येणारी योजनांसंदर्भात अंमलबजावणी कशी झाली, याचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :liquor banदारूबंदी