शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाई झाली सज्ज

By admin | Updated: September 6, 2015 00:52 IST

श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हटले की तरुणाईला आकर्षण असते, यानिमित्त भरविण्यात येत असलेल्या दहीहांडी स्पर्धेचे. मात्र अलिकडच्या काळात अशा स्पर्धांचे आयोजन कमी होत असल्याचे दिसून येते.

श्रीकृष्ण जन्मोत्सव : गावागावांतून येतात नागरिकचंद्रपूर : श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हटले की तरुणाईला आकर्षण असते, यानिमित्त भरविण्यात येत असलेल्या दहीहांडी स्पर्धेचे. मात्र अलिकडच्या काळात अशा स्पर्धांचे आयोजन कमी होत असल्याचे दिसून येते. असे असले तरी काही नवयुवक मंडळांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. चंद्रपुरात पठाणपुरा परिसरात व तुकूम येथे दहीहांडी स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आयोजक मंडळांनी जय्यत तयारीदेखील केली आहे.पठाणपुरा व्यायामशाळेजवळ उद्या रविवारी सायंकाळी ७ वाजता बजरंग दलाच्या वतीने ही दहीहांडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहा वर्षांपासून बजरंग दल या ठिकाणी ही स्पर्धा घेत आहे. दरवर्षी या स्पर्धेचे आव्हान दहाहून अधिक चमू स्वीकारतात. यात प्रामुख्याने विठ्ठल मंदिर व्यायामशाळा, जगदगुरु व्यायामशाळा, पठाणपुरा व्यायामशाळा, घाटापुरा व्यायामशाळा, श्रीराम बालक आखाडा, बल्लारपूर, एकविरा व्यायामशाळा, नांदगाव पोडे व्यायामशाळा, काळाराम मंदिर व्यायामशाळा आदींचा समावेश असतो. २० ते २२ फूट उंच दहीहांडी बांधली जाते. एकावर एक बैठक घेऊन व्यायामशाळेतील युवक ही हांडी फोडतात. प्रारंभी उंचावर बांधलेली हांडी कोणतीही चमू फोडण्यात यशस्वी होत नसेल तर हांडी काही फूट खाली उतरविली जाते. यावर्षी दहीहांडी फोडणाऱ्या मंडळास केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडून २१ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.दहीहांडी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष अंकूश चौधरी, सहसंयोजक कमलेश मडावी, अ‍ॅड. सागर मंचलवार, अंकूश दारवेकर, धीरज भट्ट, विद्यानंद दहाट आदी कार्यकर्ते या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करीत आहेत. यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय अग्निशमन विभागाचे पथक, रुग्णवाहिकांही स्पर्धा ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी चंद्रपूरसह तालुक्यातील हजारो नागरिक पठाणपुरा परिसरात येतात. गोकूल गल्लीतील परंपरा अटीमुळे खंडितगोकूल गली-सुदामा गली जन्माष्टमी मंडळाच्या वतीने चंद्रपुरात पहिल्यांदा येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या मंडळाने सातत्याने ३४ वर्ष ही परंपरा कायम ठेवली. बहुदा यामुळे नगरपालिकेने या रस्त्याला गोकूल गली हे नाव दिले असावे. मात्र मागील वर्षी पोलीस विभागाने या मंडळाला परवानगी देताना ‘अनुचित घटना घडली तर जबाबदारी मंडळाने स्वीकारावी’ असे लिहून मागितले. मंडळाने तसे करण्यास नकार दर्शविला. त्यामुळे मंडळाची ही परंपरा मागील वर्षीपासून खंडित झाली. दहीहांडी स्पर्धा असताना लक्ष्मीनारायण मंदिर परिसर नागरिकांनी फुलून यायचा, हे विशेष.