शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेची ‘रास्ता रोको’ आंदोलनाची तयारी

By admin | Updated: October 24, 2016 00:59 IST

शेतकरी संघटना कोरपना तालुक्याच्या वतीने येत्या २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भोयगाव-कवठाळा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

रस्त्याची समस्या : भोयगाव-कवठाळा येथे चक्का जाम होणार नांदाफाटा : शेतकरी संघटना कोरपना तालुक्याच्या वतीने येत्या २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भोयगाव-कवठाळा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव- चंद्रपूर रस्त्याची समस्या कायम आहे. भोयगाव पुलापर्यंत ‘रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ते’, असे चित्र पाहावयास मिळते. वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आता रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दिवे, उपजिल्हाध्यक्ष अरुण नवले, तालुकाध्यक्ष मारोती काकडे, माजी जि.प. सदस्य अशोक मुसळे, विलास धांडे, प्रविण गुंडावार, समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, पं.स. सभापती रवी गोखरे, बंडू राजुरकर, प्रल्हाद पवार, मदन सातपुते, अनंता गोडे, प्रभाकर लोडे, गणपत काळे, अविनाश मुसळे, आशिष मुसळे, भास्कर मते, किसन अवताडे, अर्जून कोटनाके, मनोहर झाडे, साईदास रोगे, दादा आस्वले, यादव चटप, पं.स. सदस्य सोयाम, संभाशिव पावडे आदी उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये भोयगाव ते कवठाळा रस्त्याचे डांबरीकरण करणे, भोयगाव ते भोयगाव पुलापर्यंत काँक्रेटीकरण, सांगोडा - भोयगाव रस्त्याचे डांबरीकरण, गडचांदूर - नांदाफाटा - वनोजा, गडचांदूर - कोरपना तथा तालुक्यातील पोचमार्गाचे डांबरीकरण करणे, कापसाला सहा हजार रुपये भाव जाहीर करावा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कापूस, सोयाबिन, धान पिकाची नुकसान भरपाई द्यावी, भोयगाव-गडचांदूर मार्गावर विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सुरू करावी आदी मागण्या करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या यशासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली असून आंदोलनात दोन हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. रस्त्याची समस्या ही प्रत्येकाची समस्या असून या आंदोलनात तालुक्यातील जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुका सचिव अरुण रागीट, उपसरपंच मोरेश्वर आस्वले, सहसचिव चंदू चटप, शांताराम पानघाटे, नरेश सातपुते, अनिल चटप, गजानन पंधरे, विलास आगलावे, अरुण काळे, शिवाजी बोढे, राजेंद्र पावडे, मुमताजभाई, पटकोटवार, लटारी ताजने, सुधाकर कुसराम, संतोष बोबाटे, भास्कर जोगी आदींनी केले आहे. (वार्ताहर)भजन मंडळे होणार सहभागीआंदोलनात कवठाळा, तळोधी, बाखर्डी, लखमापूर, पिंपळगाव आदी गावातील भजने मंडळे सहभागी होणार आहे. भजनाद्वारे घंटानाद करून शासन व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होणार आहे. यात महिलांची भजने मंडळेही सहभागी होणार असल्याचे आयोजकाचे म्हणणे आहे.आंदोलनासाठी कार्यकर्त्यांच्या गावात भेटीरस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावागावात जावून आंदोलनाची माहिती देत आहे. ‘आता खाऊ नका गस्ता झालाच पाहिजे रस्ता ’ असे सांगत लोकांनी पत्रकांचे वाटप करीत आहे. तर गावागावात फलक लावणे सुरू आहे.