शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रिया केल्यानंतरही झाली गर्भधारणा

By admin | Updated: July 15, 2015 01:07 IST

गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

मूल : गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. वैद्यकीय विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. मूल तालुक्यातील बोरचांदी येथील एका महिलेला १ जून २०१३ ला तिसरे अपत्य झाले. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी तिने २६ सप्टेंबर २०१३ ला प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतली.मागील आठवड्यात सदर महिलेने राजगड येथील आयुर्वेदिक रुग्णालयात तपासणी केली असता, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला गर्भधारणेची शंका आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठविले. १ जुलैला गर्भधारणेबाबत तपासणी करण्यासाठी सोनोग्राफी काढण्यात आली असता, सदर महिला दोन महिन्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यामुळे ती महिला हादरूनच गेली. वैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे गर्भधारणा झाल्याचा आरोप यावेळी त्या महिलेने केला. याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी तिने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)सदर महिलेची शस्त्रक्रिया करताना ट्युब चिकटकलेली असल्यामुळे ती पोकळ राहिली असावी. क्वचित प्रसंगी असा प्रकार घडू शकतो. शस्त्रक्रिया केलेल्या ट्युबमध्ये काही काळानंतर पोकळी निर्माण होऊ शकते. याबाबत केसचा अभ्यास करून पर्यायी मार्ग शोधावा लागेल.- डॉ.सुधीर मेश्रामतालुका वैद्यकीय अधिकारी मूल