शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या विळख्यात अडकली कोवळी मुले

By admin | Updated: October 27, 2015 01:15 IST

मोबाईलच्या विळख्यात कोवळी पिढी अडकल्याने त्यांच्या मनावर दुष्पपरिणाम होत असून मोबाईलचा वापर ही कोवळी

विरुर (स्टे.): मोबाईलच्या विळख्यात कोवळी पिढी अडकल्याने त्यांच्या मनावर दुष्पपरिणाम होत असून मोबाईलचा वापर ही कोवळी मुले गैरप्रकारासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक प्रगत युगात अनेक क्षेत्रात विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती केली. त्यातीलच संदेश वहन व संप्रषनाचे प्रभावी वाहक म्हणून भ्रमणध्वनीची निर्मिती झाली आणि हळूहळू आजच्या धकधकीच्या व धावपळीच्या जीवनातील जलद संपर्क म्हणून मोबाईल हा जीवनावश्यक भाग बनला. कॉलरेटच्या स्पर्धेत टिकण्यासाठी किंमतील विलक्षणीय घट केल्याने सामान्य माणसालासुद्धा मोबाईल वापरणे शक्य झाल्याने मोबाईल कंपन्याचा ‘हर हात में मोबाईल’ हा नारा खरा होत आहे. परंतु ज्या जीवनाश्यक वस्तू बनलेल्या मोबाईलचे सदुपयोग होण्यापेक्षा दुरुपयोग अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजच्या युगात मोबाईलचे स्त्रोत हे मोठ्या शहरातून थेट ग्रामीण भागात झपाट्याने पसरले असून या मोबाईलच्या जाळ्यात अनेक ग्रामीण अल्पवयीन विद्यार्थी गुरफटत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अनेक चायनामेड, विदेशी कंपन्यांनी अगदी स्वस्त किंमतीत अनेक आकर्षक मोबाईल उपलब्ध केले असल्याने युवा पिढीचा कल ब्रॅन्डेड मोबाईलपेक्षा चायनाकडे वळल्याचे दिसून येत आहे. तसेच या मोबाईलमध्ये अनेक सोई-सुविधा असल्याने चौकाचौकांत टपऱ्यांवर असणारे हे अल्पवयीन मुले मोबाईलमधील ब्लू टुथस्, वॉस्टअपचा वापर अश्लिल चित्रफित पाहण्यासाठी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक श्रीमंत पालक आपल्या मुलांना अल्पवयातच मोबाईल खरेदी करुन देतात. त्याचा ही मुले दुरूपयोग करीत आहेत. जर एखाद्याला असा नंतर तो प्राप्त झाला नाही, तर मोबाईल खरेदी करण्यासाठी तो चोरी करण्यासाठीही मागेपुढे पाहात नाही. मोबाईलचे दुकान फोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.मोबाईलमधील साऊंड सेटींगद्वारे विविध प्रकारचा आवाज काढता येतात. वृद्ध, लहान मुलांचे, स्त्रीचे, माणसांचे, तरुण मुलींचे अशा विविध आवाजातून स्वत:च्या मोबाईलमधून आवाज सेट करुन स्वत:चा आवाज मुलींच्या आवाजात बदलवून अनेक मुलींशी अश्लिल बोलून त्यांना त्रास देण्याचे प्रकारही वाढत आहे. मोबाईलमुळे पाहिजे त्यावेळी संपर्क घडून येत असल्याने मोबाईल तरूणाईच्या गळ्यातील ताईत झाला आहे. (वार्ताहर)