शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद तीन वर्षांपासून रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

राजोली : येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे परिसरातील गोपालक व शेतकरी वर्गांना आपल्या ...

राजोली : येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे परिसरातील गोपालक व शेतकरी वर्गांना आपल्या आजारी गुरावर नाईलाजाने खासगीत औषधोपचार करताना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

येथील पशुचिकित्सालयात सध्या एकच परिचर कार्यरत आहे. दवाखान्यात येणाऱ्या परिसरातील सर्व रोगग्रस्त जनावरांवर तोच गेल्या तीन वर्षांपासून उपचार करताना दिसतो. त्यामुळे नागरिकांत आणि पशुपालकात संभ्रम होत असून, जनावराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषी व पशुसंवर्धन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी व विविध लाभांच्या योजनांची अंमलबजावणी पशुधन विकास अधिकाऱ्याअभावी योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनेचे खरे लाभार्थी डावलले जात असल्याच्या तक्रारी आहेत, शिवाय या परिसरातील अनेक गावांत चांदा ते बांदा योजनेंतर्गत दुधाळ गायीचे वाटप करण्यात आले आहे, परंतु पशुधन विकास अधिकाऱ्यांअभावी बऱ्याच गायी रोगनिदान न झाल्यामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांसह येथे मंजूर असलेली सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी शेतकऱ्याची मागणी आहे.