शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तुकूमच्या बेघर वस्तीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 25, 2016 00:54 IST

तालुक्यातील तुकूम या गावाचाच एक भाग असलेल्या बेघर वस्तीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

नागभीड नगर परिषद : प्रशासकाने लक्ष देण्याची मागणीनागभीड : तालुक्यातील तुकूम या गावाचाच एक भाग असलेल्या बेघर वस्तीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वस्तीतील जलस्रोत पूर्ण निकामी झाल्यामुळे पाणी संकट ओढवले असून महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.नागभीडपासून दोन-अडीच किमी अंतरावर ही वस्ती असून वस्तीत ६० ते ७० घरे आहेत. शेती आणि पशुपालन येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या वस्तीत तीन विंधन विहिरी निकामी झाल्या आहेत. वस्तीतच एक विहिर आहे, पण ती सुद्धा आटली आहे. वस्तीत असलेले तिन्ही जलस्त्रोत निकामी झाल्याने वस्तीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याने बेजार झालेल्या येथील महिलांनी भारती बनकर यांच्या नेतृत्वात नागभीड येथे येवून नागभीड पं.स.चे माजी उपसभापती दिनेश गावंडे यांना गाठले व आपबिती कथन केली. दिनेश गावंडे यांनी लगेच तहसीलदार समीर माने तसेच नागभीड पं.स. चे पाणीपुरवठा अधिकारी वनवे यांना माहिती दिली. तहसीलदार माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनुसार गावात टँकर सुरु करु असे तर पाणीपुरवठा अधिकारी वनवे यांनी सोमवारी विंधन विहिरी दुरुस्ती करणार, असे सांगितल्याचे दिनेश गावंडे यांनी सांगितले.सद्यस्थितीत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफल्ल खापर्डे यांच्या मदतीने गावंडे यांनी शनिवारी एका टँकरद्वारे तीन हजार लीटर पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिले. प्रशासनाकडून जोपर्यंत गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात येत नाही, तोपर्यंत आपल्याकडून दररोज एक टँकर पाणी उपलब्ध दिल्या जाईल असे, दिनेश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तुकूम हे गाव नवनिर्मित नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे तुकूम येथे निर्माण झालेल्या समस्येचे निवारण नगरपरिषदेचे प्रशासक करु शकतात. प्रशासक समीर माने यांनी याबाबत त्वरीत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)