शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण

By admin | Updated: September 16, 2014 23:38 IST

वातावरणातील होणारा बदल, तापमानातील चढउतार व अवेळी येणारा पाऊस, यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे. पोंभुर्णा शहरही या आजाराने ग्रासले आहे.

देवाडा (खुर्द) : वातावरणातील होणारा बदल, तापमानातील चढउतार व अवेळी येणारा पाऊस, यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे. पोंभुर्णा शहरही या आजाराने ग्रासले आहे. शहरातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.सर्दी, खोकला, थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, कंबरदुखी, मळमळ होणे, डोळे दुखणे आदि आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने पोंभुर्णा तालुका परिसरातील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही बाह्यरुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरामध्ये अधुन-मधुन पावसाची रिमझीम सुरूच आहे. यामुळे तालुक्यातील गावागावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध आजारात वाढ होत आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास संबंधित आजार बरे होवू शकतात. हवा आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या येणे, अतिसार यासारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरून ही बाब दिसुन येत आहे. साथीची लागण सुरू असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी व विहीरींमध्ये दूषित पाणी आहे. नळाद्वारे त्याच पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजारात वाढ होत आहे. (वार्ताहर)