शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात धावणार प्रदूषणमुक्त वातानुकूलित 'ई-बस'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 16:33 IST

Chandrapur : आयुक्त विपीन पालिवाल यांच्या कल्पक दृष्टिकोनातून तयार झालेल्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वतः दिली मान्यता

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सूतोवाच केलेल्या 'पीएम ई-बस सेवे'चा प्रस्ताव अखेर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावानुसार, ५० वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. आयुक्त विपीन पालिवाल यांच्या कल्पक दृष्टिकोनातून तयार झालेल्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरकरांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची भर पडली. वातावरणातील जीवघेण्या घटकांमुळे विविध आजारांची तीव्रता वाढल्याचे शासनाचे अहवाल सांगतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रकल्पाच्या स्वरूपाबाबत आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये 'पीएम ई-बस सेवा' या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना दोन श्रेणींमध्ये लागू केली जाईल. पहिल्या श्रेणीमध्ये शहर बससेवा व संबंधित पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या श्रेणीत 'ग्रीन अर्बन मोबिलिटी इनिशिएटिव्ह'चा समावेश आहे. महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडे दोन टप्प्यांत ५० ई- बसेसचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास चंद्रपूरच्या विकासातील आमूलाग्र बदलाचा हाही एक महत्त्वपूर्ण ठरेल !

चार्जिंगसाठी किती वेळ लागेल?

'ई-बस' बसस्थानक कुठे?'ई-बस'साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाईल. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना ५० ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात २० ई-बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. पण इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, डेपो व अन्य व्यवस्थापनाचा खर्च चंद्रपूर मनपाला पेलणार काय, हाही प्रश्नच आहे.

ई-बस म्हणजे काय ?ई-बस ही एक शून्य उत्सर्जन बस आहे. ती साधारणतः कोणताही आवाज करत नाही. ते इंधनाऐवजी विजेवर चालते. अशा बसेस ऑनबोर्ड बॅटरी पॅक किंवा बाह्य स्रोताकडून ऊर्जा प्राप्त करतात. चीन व अनेक युरोपीय देशांमध्ये या बसेस आधीपासूनच वापरात आहेत. राजधानी दिल्लीत हा प्रयोग सुरु आहे.

जलद चार्जरवर ई-बस एक ते दीड तासात चार्ज करता येते. ते एका चार्जमध्ये किमान १२० किमी धावू शकते. त्यासाठी डेपो चार्जिंग स्टेशन सुसज्ज ठेवाव्या लागतात. अन्यथा अडचणी येतात. डीटीसी फ्लीटमधील ई-बस शून्य टेलपाइप उत्सर्जनासह ते इंधनावर आधारित वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करते. अशा ई-बसेस प्रदूषणावर मात करण्यास प्रभावी ठरतात.

ई-बसमध्ये काय विशेष आहे? ई-बसेसच्या किमतीनुसार त्यात विविध सुविधा असतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक बसमध्ये १० पॅनिक बटणे आणि एक टूटर असतो. शिवाय, दिव्यांग प्रवाशांसाठी गुडघे टेकण्याचा स्म्प व महिला प्रवाशांसाठी खास आसनांची व्यवस्था असते.

'ई-बस' कुठून कुठपर्यंत ?चंद्रपूर शहर व लगतच्या २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.या बसेस चंद्रपुरातून बामणी, बल्लारपूर, भदावती, घुग्गुस. आरवट-चारवट तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतीलकेंद्रीय संस्थांकडून मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडा आणि नवीन चंद्रपूर बसस्थानक, चार्जिंग स्टेशन व इतर सेवा केंद्र सरकारच्या निधीतून नागरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमाने उभारल्या जातील.

महापालिकेने केंद्र सरकारला ई-बस'चा प्रस्ताव सादर केला. कृषी भवन परिसरात पीएम ई-बस सेवेसाठी पायाभूत संरचना उभारण्याची प्रशासनाची योजना आहे. सीएमसी'ला शहर बससेवा संचालनाचे कंत्राट दिले जाईल, अशी शक्यता आहे. बस चालवण्यासाठी सरकार प्रति किमी २५ रुपये अनुदान देईल. मुख्य बसस्थानक व पीएम ई-बस स्थानक एकमेकांशी जोडले जाईल. साधारणतः वर्षभरात ही सेवा सुरू होईल, यादृष्टीने प्रयल केले जात आहेत.- विपीन पालिवाल, आयुक्त, महापालिका, चंद्रपूर. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरchandrapur-acचंद्रपूर