शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

जिल्ह्यात आज ५२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:21 IST

पाच जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली केली असून विजयासाठी प्रचाराचा धुराडा उडविण्यात आला होता.

ठळक मुद्देयंत्रणा सज्ज : सर्वच राजकीय पक्षांच्या समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाच जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली केली असून विजयासाठी प्रचाराचा धुराडा उडविण्यात आला होता. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले. अनुचित घटना घडू नये, यासाठी मूल, राजूरा, चंद्रपूर, भद्रावती, नागभिड, जिवती, वरोरा, पोंभुर्णा, चिमूर तालुक्यातील संबंधित गावांत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागभिड : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी १५५ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २३ उमेदवार सरपंच पदाचे दावेदार आहेत. १६९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. पण यातील १४ उमेदवारांनी परत घेतल्याने आता प्रत्यक्ष मैदानात १५५ उमेदवार आहेत. चिखलगाव १३, गोविंदपूर ३९, गिरगाव ३८, मांगली १४ आणि मिंथूर येथील २८ उमेदवारांचा समावेश आहे. सरपंचपदासाठी चिखलगाव येथे तीन, गोविंदपूर चार, मांगली येथे सात मिंथूर येथे चार आणि गिरगाव येथे पाच उमेदवार आहेत. गोविंदपूर येथे ११ जागासाठी ३९ उमेदवार उभे आहेत. ही ग्रामपंचायत हस्तगत करण्यासाठी चार पॅनल एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. या ठिकाणी दोन हजार ३७८ मतदार आहेत. राजकीयदृष्ट्या जे काही संवेदनशील गावे आहेत. त्यात मिंथूर चाही समावेश आहे. येथे नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. सदस्यपदासाठी २८ आणि सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले. मतदार संख्या एक हजार ६४७ आहे. ही ग्रामपंचायत सात सदस्यीय आहे. सदस्यपदासाठी १४ आणि सरपंच पदासाठी सात उमेदवार भाग्य अजमावित आहे. एक हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चिखलगाव येथेही काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत पॅनल एकमेकांसमोर उभ्या ठाकले. सात जागांसाठी १३ उमेदवार तर सरपंच पदासाठी तीन उमेदवार येथे रिंगणात आहेत. ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.भद्रावती : तालुक्यातील रानतळोधी विसलोन, गुंजाळा, टेकाडी, चिचोली, चारगाव, धानोली या सात ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार २२९ मतदार असून त्यात २ हजार २२२ पुरुष व २ हजार ७ महिलांचा समावेश आहे. सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये ना.प्र. प्रवर्गाचा एकच अज दाखल झाल्याने रानतळोधी येथे अरुणा सुधाकर नन्नावरे या सरपंच म्हणून अविरोध निवडून आल्या आहे. रानतळोधी ग्रा.पं.मध्ये पाच, विसलोन १, चारगाव सात, धानोली एक याप्रमाणे सदस्य अविरोध निवडून आले मतदानासाठी एकूण २० केंद्र आहेत. निवडणूक अधिकारी तहसीलदार महेश शितोळे तसेच कनिष्ठ लिपीक व्ही.व्ही. बोरेकर कामावर लक्ष ठेवून आहे.पोंभूर्णा : बोर्डा झुल्लूरवार व बोर्डा बोरकर येथे सरपंचपदाची थेट निवडणूक होणार आहे, बोर्डा बोरकर ग्रा.पं. येथे सरपंचपदासाठी रॉकेश नैताम बालाजी नैताम यांनी अर्ज दाखल केले. मात्र रॉकेश नैताम यांचा अर्ज रद्द झाल्याने एकमेव म्हणून भाजपच्या बालाजी नैताम हेच आता सरपंचपदाचे दावेदार आहेत. आठ सदस्य असलेल्या बोर्डा झुुल्लूरवार ग्रा.पं.च्या सरपंच पदासाठी एस.सी.साठी राखीव असून अपक्ष म्हणून शालीक बुधाजी रामटेक, राहूल रामटेके, गौतम रामटेके हे सरपंच पदाच्या शर्यतीत आहेत.मूल : तालुक्यात सात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपा-काँग्रेसच्या नेत्यांनी जोमात प्रचार केला. सात ग्रामपंचायतीसाठी २२ उमेदवार नशिब अजमावित आहे. उश्राळा चक, बेंबाळ, बोंडाळा खुर्द, आकापूर, गडीसुर्ला, बाबराळा आणि चकदुगाळा या सात ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाने जय्यत केली. उश्राळा चक येथील सरपंचपद हे सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. बेंबाळ येथे अनुसूचित जाती, बोंडाळा खुर्द येथे सर्वसाधारण, आकापूर येथे अनुसूचित जमाती, गडीसुर्ला येथे अनुसूचित जाती, बाबराळा येथे नामप्र स्त्री आणि चकदुगाळा येथे सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे, बोडाळा खुर्द, गडीसुर्ला, आकापूर आणि चकदुगाळा या ग्रामपंचायत काँग्रेसच्या कब्जात आहे तर बेंबाळ, बाबराळा आणि उश्राळा चक या ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आहे. गडीसुर्ला येथील सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे याठिकाणी पाच उमेदवारांनी नामाकंण दाखल केले आहे. या निवडणुकीत प्रशासनाने सात ग्रामपंचायतीसाठी २२ बुथ तयार केले असून चार निवडणूक निर्णय अधिकाºयांची नेमणूक केली. मतदान करताना कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ५७ पोलीस कर्मचारी आणि ४९ गृहरक्षक दलाचे जवान गावांत तैणात करण्यात आले आहे. बेंबाळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजली. भाजपच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेसचे समर्थक पुढे आल्याने प्रचारात रंगत वाढली होती. सरपंचपदाच्या थेट निवडीत भाजपाच्या करूणा जर्मन उराडे तर काँग्रेसच्या समर्थक माजी सरपंच आशादेवी दिनकर टिपले यांच्यातील सरळ लढत लक्षवेधी ठरणार आहे. राजकीयदृष्ट?ा संवेदनशील असलेल्या तालुक्यात निवडणूक होणाºया सर्वच गावांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखविण्यात आली होती. अवलंब केल्याचे बोलले जात आहे. सरपंच पदाच्या थेट निवडीत करूणा उराडे, आशादेवी टिपले, सुवर्णा मेश्राम यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस- भाजपा यांच्यातील अस्तित्व सिध्द होणारे आहे.कोरपना : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेस, शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यार्नी आपापले उमेदवार निवडून आणण्याकरिता कंबर कसली आहे. बाखर्डी, कुकडसाथ, निमनी, कवठाला, गाडेगाव (विरुर), अंतरगाव, कोडशी, माथा, बोरगाव आदी ९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्यातच खरी लढत असल्याचे दिसून येते. तालुक्यात परंपरागत राजकीय शत्रू मानले जाणारे काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, आमदार संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आदींनी प्रचारात उघडपणे उतरल्याने कुणाचे समर्थक सत्तेवर येतात, याकडे म् मतदारांचे लक्ष लागले आहे.राजूरा : तालुक्यात चार ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. देवाळा, हरदोना खुर्द, विरुर स्टेशन, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे. यावेळी सरपंचपदाची थेट निवडणूक होणार असल्याने साºयाच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता. त्यामुळे ही निवडणुक महत्त्वाची मानली जात आहे. मागील निवडणुकीतही प्रचाराला जोर आला होता. भाजपा, काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनासह अन्य पक्षांनीही आपल्या समर्थकांना या निवडणुकीत उतरविले आहे. संवेदनशील गावांत पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. शिवाय, निवडणूक विभागाचे कर्मचारी सर्व साहित्य घेऊन मतदान केंद्रात उपस्थित झाले. रविवारी मतदान होणार असल्याने गावखेड्यांत राजकारण हा एकच विषय चर्चेला असल्याचे सध्या दिसून येते.