शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी उद्या मतदान

By admin | Updated: April 16, 2016 00:38 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवार १७ एप्रिलला मतदान होणार आहे.

उमेदवारांच्या गुप्त बैठका : काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांत चुरसचंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवार १७ एप्रिलला मतदान होणार आहे. १८ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात असून प्रचार तोफा थांबला आहे. उमेदवार आता गुप्त बैठका घेत आहेत. या बाजार समितीवर आजवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार असल्याने कोणत्या पक्षाचे वर्चस्व बाजार समितीवर प्रस्थापित होईल, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींच्या घरात आहे. येथील संचालक मंडळाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर मात्र वर्षभर प्रशासक मंडळाने बाजार समितीचा कारभार सांभाळला आणि त्यानंतर शासकीय पॅनल बाजार समितीवर बसले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मतदारांत ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य, हमाल, मापारी, अडते आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी व रात्री उशिरापर्यंत बैठका घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. काही ठिकाणी तर मतदारांना खूश करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन होत असल्याची चर्चा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात १८ उमेदवारांचा समावेश असून सेवा सहकारी संस्थेच्या गटातून एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून ११ उमेदवारांना निवडूण द्यायचे आहेत. ग्रामपंचायत गटात सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. व्यापारी-अडते मतदारसंघातून पाच उमेदवार असून, त्यातील दोन उमेदवारांना, तर हमाल-मापारी गटातून एक उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली असून उमेदवारांचे भाग्य सोमवारी कळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)