शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय आखाड्यासाठी राजकीय नेते सज्ज!

By admin | Updated: July 10, 2015 01:33 IST

राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून.

राजुरा: राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घोषित होताच सभा संमेलने घेऊन मतदारांना जवळ करण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी सुरू केले असून ही निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटनानी मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे.राजुरा तालुक्यातील चार्ली, चिंचोली (खु.), चुनाळा, गोवरी, कठोली (बु.), कविठपेठ, मुठरा, पेल्लोरा, विहिरगाव, वरोडा, बामनवाडा, चंदनवाही, चिचोली (बु.), कोहपरा, कोलगाव, मूर्ती, पंचाळा, पवनी, सातरी, चनाखा, धानोरा, कळमना, खामोना, मारडा, नलफडी, सिंधी, सुमठाना, धिडसी या २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंत्यत चुरशीच्या होणार असून प्रत्येक गावामध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना सक्रीय आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षासोबत युती करणार यावर पुढील चित्र दिसणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांना आपल्या कामाचा वेग वाढवून त्यांना नव्याने जोडणी करुन आपल्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपाची टक्कर काँग्रेस, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे.काँग्रेस पक्षानेसुद्धा निवडणुकीची मोर्चेबांधणी केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी व्युहरचना आखणे सुरू केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव पत्करावा लागल्यामुळे माजी आमदार सुभाष धोटे या निवडणुकीत कुठलीही जोखीम न घेता निवडणुक जिंकायची यासाठी सज्ज झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेलासुद्धा कमी लेखता येणार नाही. शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप सातत्याने मतदाराच्या संपर्कात असून ते कधीही थकताना दिसत नाही. इच्छुक उमेदवारांची त्यांनी पडताळणी सुरू केली असून उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे याची भूमिकासुद्धा निर्णायक राहणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हेदेखील निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून कार्यक्रम आखणीत ते तरबेज आहेत. ते स्वत: नियोजन करीत असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी तेदेखील सज्ज दिसत आहेत. या निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेच्या असल्याने सर्वांनीच त्या गांभीर्याने घेतल्या आहेत. पुन्हा एकदा मतदाराच्या दारात मत मागणीसाठी नेते मंडळी आश्वासनाच्या खैराती घेऊन येणार आहेत. (शहर प्रतिनिधी)