८० जणांची तपासणी : पोलीस दलाचा उपक्रमगडचांदूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडून गडचांदूर उपविभागात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक कंपनीच्या सभागृहात करण्यात आले.आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन ठाणेदार विनोद रोकडे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात चंद्रपूर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीक्षित व त्यांच्या चमूने ८० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याची संपूर्ण तपासणी करून त्यांपैकी ३३ पोलीस कर्मचाऱ्यांना पुढील तपासणीसाठी चंद्रपूर येथे बोलविले आहे. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेतल्याने पोलीस विभागात समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
आवारपूर येथे पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबिर
By admin | Updated: March 20, 2016 00:58 IST