शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस निलंबित

By admin | Updated: September 9, 2015 00:49 IST

एका निरपराध व्यापारी युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस शिपायांना सोमवारी निलंबित केले,...

रोहीत बोथरा मारहाण प्रकरण : एलसीबीचे सुधाकर अंभोरे पूर्वपदावर चंद्रपूर : एका निरपराध व्यापारी युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस शिपायांना सोमवारी निलंबित केले, तर मारहाण करताना उपस्थित असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना घुग्घूस येथे पूर्वपदावर रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे अंभोरे हे घुग्घूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांना नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना करून त्यांचा प्रभार घुग्घूसचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना देण्यात आला होता. चंद्रपुरातील व्यापारी रोहीत बोथरा हा ३१ आॅगस्टच्या रात्री इंडिका कारने चिमूर येथून व्यापारातील वसुली करून चंद्रपूरकडे परत येत असताना घोडपेठलगत एका क्रमाक नसलेल्या वाहनातील विना गणवेशधारी पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते लुटारू असावेत, अशा भितीने रोहीत वेगाने चंद्रपूरकडे निघाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. काही ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहीतने भितीपोटी आपल्या वाहनाचा वेग वाढवत कसेबसे चंद्रपूर गाठले व सुरक्षेच्या दृष्टीने तो रामनगर पोलीस ठाण्याकडे निघाला. मात्र वाहतूक नियंत्रण कार्यालयासमोर काही पोलीस शिपाई दिसल्याने त्याला धीर आला. त्याने लगेच तेथे आपले वाहन थांबविले. मात्र याचवेळी विना क्रमांकाच्या टाटासुमोतून उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रोहीतला वाहनाखाली ओढून बेदम मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याला फरफटत वाहतूक नियंत्रण कार्यालयातील संगणक कक्षात नेऊन पुन्हा बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महेंद्र इंगोले यांनी रोहीतला पायातील बुटाने अक्षरश: चेपले. हा प्रसंग अंगावर काटे आणणारा होता. इंगोलेंच्या मारहाणीत रोहीतच्या कानाचा पडदा फाटला. (प्रतिनिधी)