शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

महापौर कंचर्लावार यांच्या सदस्यत्व रद्दसाठी उच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: September 10, 2015 00:45 IST

महापौर राखी कंचर्लावार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया आणि माजी सभापती

चंद्रपूर : महापौर राखी कंचर्लावार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया आणि माजी सभापती नंदू नागरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केली आहे.राखी कंचर्लावार या काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र त्यानंतर त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश घेतला. याशिवाय यादरम्यान काँग्रेस पक्षाचा व्हीप झुगारून ११ नगरसेवकांनी मतदान केले. विशेष म्हणजे, त्यावेळी सुनिता लोढिया या काँग्रेसकडून महापौर पदाच्या निवडणुकीत उभ्या होत्या. या प्रकरणात सुनिता लोढिया यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह ११ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. ही याचिका विभागीय आयुक्तांनी खारीज केली. या निर्णयाला आव्हान देत लोढिया आणि नागरगर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली आहे. या ११ नगरसेवकांमध्ये माजी महापौर संगिता अमृतकर, स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, रामू तिवारी यांचाही समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)