शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रात फलक, सीसीटीव्ही कॅमेरे लावा

By admin | Updated: December 31, 2015 00:47 IST

प्रतिबंधित क्षेत्र असतानाही सिनाळा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू होतो.

हंसराज अहीर यांचे निर्देश : सिनाळा खाण दुर्घटनास्थळी भेटचंद्रपूर : प्रतिबंधित क्षेत्र असतानाही सिनाळा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. वेकोलि प्रबंधनाच्या अक्षम्य चुकीमुळेच ही दुर्घटना घडली. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रात फलक, सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर दिले. सिनाळा येथील खाण दुर्घटनास्थळी बुधवारी ना. अहीर यांनी भेट देवून पाहणी केली. भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची दक्षता वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, दुर्गापूरचे सहा.पोलीस निरीक्षक, उपक्षेत्रीय प्रबंधक सिंग, गुप्ता, सरपंच नीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपूरे, लोकचंद कापगते, पूनम तिवारी, विलास टेंभुर्णे, सुभाष गौरकार, पोलीस पाटील जीवनकला मांडवकर आदी उपस्थित होते.ऊर्जानगरातील समता नगर येथील बंटी राऊत व अमोल अल्लेवार या दोन युवकांचा बंद स्थितीत असलेल्या सिनाळा खाणीतील पाण्यात बुडून सोमवारी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची दखल घेवून ना. अहीर यांनी घटनास्थळावर जावून वेकोलि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश केला जातो, ही बाबच गंभीर असून वेकोलि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच असे घडत आहे. याची गांभीर्याने दखल घेवून या प्रतिबंधित क्षेत्रात ठिकठिकाणी प्रवेश निषिद असे फलक लावावेत, आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपन करुन या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, या खाणीतील पाणी जवळच्या तलावात सोडणे शक्य असल्यास तसे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देत भविष्यात असा प्रकार घडल्यास व्यवस्थापनाला दोषी का धरण्यात येवू नये, असेही उपस्थित अधिकाऱ्यांना ना. अहीर यांनी सुनावले. (स्थानिक प्रतिनिधी)