शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST

चंद्रपूर : शासनाकडून अद्याप तिसऱ्या लाटेबद्दल सूचना नसली, तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तयारीत राहावे. औषधी, मनुष्यबळ, आरोग्य ...

चंद्रपूर : शासनाकडून अद्याप तिसऱ्या लाटेबद्दल सूचना नसली, तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तयारीत राहावे. औषधी, मनुष्यबळ, आरोग्य तपासणी, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड्सचे नियोजन आतापासूनच करून ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोविडविषयक आढावा बैठकीत गुरुवारी दिले.

यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मुख्याधिकारी विजय सरनाईक व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फॅसिलिटी अ‍ॅप पोर्टलमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची उपलब्ध माहिती पोर्टलवर अपडेट करावी. पोर्टलवर एंट्रीमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक बाबींची माहिती अद्ययावत करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेला गृहीत धरून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्यासाठी जागा पाहून ठेवावी. तसा प्रस्ताव तातडीने सादर करावा. जिल्ह्यात नो मास्क, नो एन्ट्री ही मोहीम यशस्वी झाली. ही मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

आयएलआय सारीचे घरोघरी सर्वेक्षण

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तालुकास्तरावरील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ आढावा घेतला. खासगी सीसीसी, डीसीएच ऑडिटरची टीम नियुक्ती झाली. रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या देयकांची तपासणी करावी, परवानगी नसताना मान्यता नसलेले डॉक्टर कोविड रुग्णांवर उपचार करता कामा नयेत, याकडेही लक्ष द्यावे, आयएलआय व सारीचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.

२० मे रोजीे पंतप्रधान घेणार आढावा

देशाचे पंतप्रधान जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे सादरीकरण करताना डिस्चार्ज झालेले रुग्ण, दैनंदिन बाधित रुग्ण, मृत्यू, अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, आरटीपीसीआर, अँटिजन तपासणी, आयएलआय व सारी रुग्णांची दैनंदिन माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.