शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागडसंदर्भात जनहित याचिका दाखल करणार

By admin | Updated: April 29, 2016 01:10 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड टेकड्यामधील लोह-खनिजाचे उत्खनन सुरु आहे. याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे आंदोलन सुरु आहे.

पत्रकार परिषद : अखिल भारतीय आदिवासी महासभेचा निर्णयचंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड टेकड्यामधील लोह-खनिजाचे उत्खनन सुरु आहे. याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. जनतेला विश्वासात न घेता मुजारीने चालविलेल्या सुरजागड उत्खननाविरोधात अखिल भारतीय आदिवासी महासभेने जनहित याचिका टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, नगरसेवक संजय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.सुरजागड येथील लोह - खनिज काढून नेण्यासाठीचे कंत्राट लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड इंजिनिअर्स लि. डोंबीवली (इस्ट) जिल्हा ठाणे या कंपनीला देण्यात आले आहे. याला स्थानिकांचा विरोध आहे. उत्खनन कार्य स्थगित करुन जिल्ह्यातच प्रकल्प उभारुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करुन सुरजागड येथील उत्खनन कार्य सुरुच आहे. भामरागड वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी लोह, खनिज वाहून नेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीने मोठमोठे वृक्ष तोडून टाकले. रस्ता बनविण्याच्या नावाखाली गैरकायदेशिरपणे जंगल उद्धवस्त करण्याचा सपाटा सुरु केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला २० वर्षाचा काळ लोटला. मात्र आतापर्यंत येथील औद्योगिक विकास झाला नाही. जिल्हानिर्मितीनंतरही एकही उद्योग येथे सुरु झाला नाही. सरकारने आताच सुरजागड पहाडावरील लोहखनिजांचे उत्खनन करण्यात आलेले लोहखनिज वाहतूक करण्याचे काम लॉयड्स मेटल या कंपनीला दिले. याविरोधात सुरजागडवासींचा लढा सुरु आहे. जिल्ह्यातील खनिज संपती बाहेर न नेता येथेच लोकप्रकल्प उभारुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. येथे सुरु असलेले आंदोलनही दडपण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे सरकारविरोधात जनतेच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अमृतकर, पप्पू देशमुख, संजय वैद्य, नामदेव कन्नाके, डॉ. महेश कोपुलवार यांनी यावेळी सांगितले. (नगर प्रतिनिधी)