शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मोंदीच्या भाषणासाठी दूरदर्शनला फोन

By admin | Updated: September 6, 2014 23:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी प्रशासनाने विशेष दखल घेतली. शिक्षकांनी शाळेतील

शिक्षकाची आस्था : तयारी करूनही भाषणापासून विद्यार्थी वंचितचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी प्रशासनाने विशेष दखल घेतली. शिक्षकांनी शाळेतील अडगळीत असलेल्या टीव्ही संचावरील धूळ साफ केली. काही शाळांनी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी चार ते पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांना पंतप्रधानाबद्दल माहितीही देणे सुरु केले. एवढे सर्व करूनही नॅशनल चॅयनलवर कार्यक्रम दाखविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी हिरमुसले. विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून एका शिक्षकांने चक्क मुंबई दूरदर्शनला फोन करून विचारणा केली. एवढेच नाही तर, कार्र्यक्रमाची सिडी देण्याची विनंती केली. ही त्यांची विनंती दूरदर्शनने मान्य केली. विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या या शिक्षकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चालबर्डी येथे सातव्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ग्रामीण परिसर असल्याने या गावामध्ये पाहिजे त्या सुविधा अद्यापही पोहचल्या नाही. विद्यार्थ्यांना सर्वमाहिती मिळावी, त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावे यासाठी आजही काही शिक्षक नेहमी धडपड करतात. असेच एक शिक्षक चालबर्डी जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सातत्याने प्र्रयत्न करणाऱ्या या शिक्षकांचे प्रकाश भांदककर असे नाव आहे. तर या शाळेमध्ये भसारकर, आस्वले, घोडमारे, बन्सोड, कन्नाके आदी शिक्षकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. केंद्रप्रमुख नागेंद्र कुमरे यांनीही शाळेला भेट देवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधांचा संवाद ऐकता, पाहता यावा यासाठी शिक्षकांनी शाळेतील टी.व्ही संच दुरुस्त केला. एवढेच नाही तर एक एन्टीनासुद्धा आणला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षकही उपस्थित होते. सर्व विद्यार्थी टीव्ही संचासमोर मोदींच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत होते. मात्र दुपारचे ३.३० वाजले असतानाही नॅशनल चॅनलवर क्रीकेट मॅच दाखविण्यात येत होती. चिमूकले विद्यार्थी शिक्षकांना सारखे विचारपूस करीत होते. विद्यार्थ्यांची उत्स्तुकता येथील प्रभारी मुख्याध्यापक प्र्रकाश भांदककर यांनी स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचा फोन नंबर मिळवून थेट फोन करून विचारणा केली. यावेळी त्यांना दिल्लीवरून कार्यक्रम प्रसारिक करण्यात येत असून सहाद्री तसेच इतर खासगी चॅनलवरून कार्यक्रम दाखविण्यात येत आहे. मात्र नॅशनल चॅनलवर कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्याच्या सूचना नसल्याचे त्यांना सांगितल्या गेले. विद्यार्थ्यांसाठी त्यांची धडपड पाहून शाळा व्यवस्थापन समितीनेही त्यांचे कौतूक केले. (नगर प्रतिनिधी)