शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वभागात पेट्रोल टाकून मारहाण

By admin | Updated: April 20, 2016 01:27 IST

एका अल्पवयीन मुलाला दारूच्या प्रकरणात अटक केल्यानंतर शेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकून त्याला बेदम मारहाण केली,

पोलीस अधिकाऱ्याचे कृत्य: पिडीताच्या पित्याने केला आरोप वरोरा: एका अल्पवयीन मुलाला दारूच्या प्रकरणात अटक केल्यानंतर शेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकून त्याला बेदम मारहाण केली, असा खळबळजनक आरोप पिडीत मुलाच्या पित्याने केला आहे. पिडीत मुलगा शेगाव येथे मामाकडे येथे पाहुणा म्हणून आला होता. पोलिसांच्या मारहाणीनंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पिडीत मुलाच्या वडिलाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली केली आहे. भद्रावती येथील रहिवासी केशव टापरे यांचा १७ वर्षीय मुलगा योगेश नवघरे शेगाव येथे आपल्या मामाकडे गेला होता. केशव टापरे यांच्या मुलाला त्यांचे नातेवाईक विश्वास टापरे यांनी त्यांच्या दुकानातील नोकर महात्मा निमजे यास बोलाविण्यास पाठविले. त्याचवेळी शेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी महात्मा निमजे याच्या घरी अवैध दारूबाबत चौकशी करीत होते. दरम्यान केशव टापरे यांचा मुलगा तेथे पोहचला. तोदेखील दारूच्या व्यवसायात सहभागी असल्याचा आरोप करून म्हणून त्यालाही पोलीस ठाण्यात नेले व अवैध दारू प्रकणी अटक केली. मी या धंद्यात नाही.महात्मा निमजे यांना बोलविण्यासाठी आलो होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी मुलाचे काहीही न ऐकता त्याला अटक केल्याचा आरोप केशव टापरे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजता टापरे यांच्या दुकानाच्या बाजुला तीन लाख ४९६ रुपयांची दारू पकडली असता त्या ठिकाणी सदर मुलगा हजर होता. टापरे यांच्या दुकानात काम करीत होता. तो दारु पुरवठा करीत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल सुधारगृहात पाठविले. त्याला कोणत्याही प्रकारची मारझोड व पेट्रोल टाकण्याचा प्रकार झाला नाही.- प्रवीण डांगे, ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन