शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय बांबू कामगार तीन दिवसांपासून उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 00:57 IST

वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी चुलीच पेटविल्या नाही...

वनविकास महामंडळातील प्रकार : पगारासाठी जंगलातच मजुरांचा ठिय्याकोठारी : वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी चुलीच पेटविल्या नाही व उपाशीपोटी जंगलात ठिय्या मांडून बसल्याचा प्रकार निदर्शनास आला. अन्नाविना तडफडणाऱ्या मजुरांकडे कोणी अधिकारी व कर्मचारी लक्ष देण्यास तयार नसल्याने ९० ते १०० मजूर कोठारी जवळील अडेझरी नाल्यावर रात्रदिवस काढत होते. हा अमानविय प्रकार गोंडपिंपरीचे राजेश कवठे, अरुण वापलवार यांना समजताच त्यांनी तातडीने मजुरांना अन्न पाण्याची व्यवस्था केली. या संतप्त प्रकाराने माणसातील माणूसकी हरविल्याची व मजुरांच्या शोषणाची गंभीर समस्या उघड झाली.मध्यप्रदेशातील बालाघाट येथील दीड ते दोन हजार मजूर मध्य चांदा वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्रात बांबु कटाईचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून करीत आहेत. आता बांबू कटाईचे कामे अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झालेल्या मजुरांना पूर्ण पगार घेवून घराकडे परतीचे वेध लागले आहे. या मजुरांना आवठडी बाजारासाठी २०० ते ३०० रुपये अ‍ॅडवान्स देण्यात येते. मात्र मागील दोन आठवड्यात मजुरांना पैसे देण्यात आले नाही. परिणामी मजुर धान्य, भाजीपाला व किराणा खरेदी केला नाही. त्यामुळे कामगार तीन दिवसांपासून उपाशी होते. या प्रकाराची माहिती होताच राजेश कवठे व अरुण वासलवार यांनी घटनास्थळावर त्वरीत दाखल झाले. मजुरांची परिस्थिती पाहून संताप व्यक्त करीत मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. कोठारीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, गोंडपिंपरीचे तहसीलदार मलिक विराणी, अडेझरीत दाखल झाले. वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रकाराची माहिती दिली. मात्र याकडे कुणीही फिरकून पाहिले नाही. अखेर झरण क्षेत्राचे वनाधिकारी अजय पवार व प्रफुल्ल निकोडे हे मजुरांना वेतन देण्यासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता आले व पगार वितरीत केला. (वार्ताहर)