शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केले कौशल्याचे प्रदर्शन

By admin | Updated: November 30, 2015 00:59 IST

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याकरिता चांदा पब्लिक स्कूल येथे इदु-फिस्ट-२०१५ चे आयोजन करण्यात आले.

चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याकरिता चांदा पब्लिक स्कूल येथे इदु-फिस्ट-२०१५ चे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक, वैज्ञानिक, गणितीय, साहित्यिक इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.विद्यार्थ्यांना ज्या विषयात आवड आहे, त्यात तो विद्यार्थी पुढे जावा असाच नेहमी शाळेचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हे फक्त स्पर्धेसाठी नसून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस मुख्य अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजा बोझावार हे तर शाळेच्या संचालिका स्मिता संजय जीवतोडे तसेच प्राचार्या भावना व्ही.एस. हे उपस्थित होते. संदीप दिवान यांनी सांगितले की, चारी सदनांची नावे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले व त्यांनी आचार्य चाणक्य, महर्षी वेदव्यास, महर्षी चरक, महर्षी पाणीनी या महान व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकला व आपण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाने स्वत:ला व देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक व्यक्तीने देशाच्या प्रगतीला आपला हाभतार लावावा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे, अशोक कांबळे, विजय साळसकर तसेच शिपाई तुकाराम ओंबाले यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केले. आभार अंजली बंडावार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)