शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव कराने जनतेचा खिसा हलका

By admin | Updated: January 3, 2016 01:25 IST

शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकन झाले. करात भरमसाठ वाढ होणार असल्याची ओरड जनतेतून होऊ लागली

नागरिकात संताप : फेरमूल्यांकनानंतर मूल नगरपालिकेचा निर्णयचंद्रपूर : शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकन झाले. करात भरमसाठ वाढ होणार असल्याची ओरड जनतेतून होऊ लागली. सत्ताधाऱ्यांनी फेरमूल्यांकन रद्द करून जुन्या करावर २० टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, आता फेरमूल्यांकनावर मागविलेल्या आक्षेपांवरील सुनावणीनंतर करआकारणी करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या नगररचनाकार विभागाने घेतला. त्यामुळे मूलवासीयांना भरमसाठ मालमत्ताकर भरावा लागणार असल्याने त्यांचा खिसा हलका होणार आहे.नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार मूल नगरपालिकेने १९९२ नंतर प्रथमच फेरमूल्यांकन करीत चार वर्षांसाठी नवीन कर आकारण्याचे ठरविले. त्यानुसार सभेत ठराव पारित करण्यात आला. शहरात ६ हजार ८२४ मालमत्ताधारक फेरमूल्यांकन नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले.मालमत्ताकरात भरमसाठ वाढ होण्याचे भाकीत वर्तवित मूलवासीयांनी फेरमूल्यांकनावर आक्षेप नोंदविला. राजकीय पुढाऱ्यांसोबतच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही जनतेच्या सुरात सूर मिसळविला. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने फेरमूल्यांकनावर जनतेकडून आक्षेप मागविले. या आक्षेपावरील सुनावणीसाठी नागरिकांनी पालिकेत मोठी गर्दी केली होती. मात्र, जनतेचे समाधान झाले नाही.त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी फेरमूल्यांकन रद्द करून जुन्या करावर २० टक्के वाढीव कर लावण्याचा निर्णय सभेत घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सभेत मंजूर ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची होती. मात्र, अजूनपर्यंत ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे आता मूलवासीयांना फेरमूल्यांकनानुसार मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)