शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

वेतन आयोगाची रक्कम मिळालीच नाही

By admin | Updated: February 21, 2016 00:35 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत हंगामी मलेरिया फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची ...

शासनाचे दुर्लक्ष : हंगामी मलेरिया फवारणी कर्मचाऱ्यांत असंतोषवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत हंगामी मलेरिया फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम मागील कित्येक महिन्यांपासून अदा करण्यात आली नाही. त्यामुळे या कामगारांमध्ये असंतोष पसरत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप कार्यालयातील अस्थाई मलेरिया हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम तातडीने मिळवून देण्याचे निर्देश सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांना दिले. त्याची दखल घेऊन सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडून हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या रकमेचा प्रस्ताव पाठविल्याचे निर्देश दिले. त्यानुसार मलेरिया हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम मिळण्याबाबत प्रस्ताव संचालक आरोग्य सेवा संचलानालय मुंबई यांच्यामार्फत प्रधान सचिव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आला. परंतु मागील नऊ महिन्यापासून प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली नाही. गेल्या पाच वर्षांपासून सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम हंगामी कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याने कर्मचारी मानसिक तनावाखाली जीवन जगत आहे. कर्मचाऱ्यांचे विनाकारण मानसिक व आर्थिक नुकसान करुन जीवन जगण्याचा प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारत अनुसूचित जाती परिषद तथा जनजाती कर्मचारी परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भा.गो. टिपले, उपाध्यक्ष अ‍ॅड.शैलेंद्र जिलटे, सरचिटणीस आचार्य गौतम दारुंडे, कार्याध्यक्ष दिलीप टिपले, सचिव दिलीप करलुके, संघटन सचिव प्रदीप कांबळे, मलेरिया फवारणी कर्मचारी तुकाराम हनवते, महादेव बदकी, देवीदास खोंडे, जोगेंद्र उताने आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)