शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

घोसरी परिसरातील रुग्ण बोगस डॉक्टरांवर अवलंबून

By admin | Updated: April 26, 2016 00:38 IST

नवेगाव मोरे येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, सेविकांची पदनियुक्ती पाच वर्षांपासून रखडली असून ...

नवेगाव मोरे केंद्र : घोसरी उपकेंद्रातील आरोग्य सेवेला ग्रहणघोसरी : नवेगाव मोरे येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, सेविकांची पदनियुक्ती पाच वर्षांपासून रखडली असून कार्यरत सेविका नियमितपणे कर्तव्य बजावत नसल्याने उपकेंद्र कुलूपबंद असते. गाव पातळीवर वेळीच प्राथमिक सेवा मिळत नसल्याने तक्रारवजा निवेदने देवून सुद्धा अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखविली नाही. त्यामुळे येथील आरोग्य सेवा बोगस डॉक्टरांवर अवलंबून आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे प्राथमिक केंद्रातर्गत २६ गावांचे व्याप्त क्षेत्र असून घोसरी वेळवा, देवाडा(बुज), घाटकुळ व नवेगाव मोरे ही उपकेंद्र आहेत. केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असून पोंभूर्णा येथील प्रभार दिले असल्याने रुग्ण सेवेला ग्रहण लागले आहे. भरीसभर घोसरी उपकेंद्रात आरोग्य सेवक व प्रसुती सेविकाची पदनियुक्ती करण्याचे सौजन्य संबंधितांनी दाखविली नसल्याने स्थानिकांना कमालिचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.घोसरी उपकेंद्र सद्य:स्थितीत रामभरोसे दिसत आहे. आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसून कर्तव्यात कसूर करीत असल्याने उपकेंद्र सतत कुलूपबंद असते. त्यामुळे मदतनीस घरकामात राहत असून साध्या तापाच्या गोळ्याचे वाटपसुद्धा केल्या जात नाही.उपकेंद्रातील सेवा विस्कळीत राहत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तक्रारवजा निवेदने वरिष्ठांना दिलेली आहेत. परंतु या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली. जी सेविका कार्यरत राहत नाही, तिचे वेतन मात्र नियमित काढल्या जात आहे. सद्य:स्थितीत उन्हाचा पारा चढलेला असून उष्णतेमुळे रुग्णांना जर्जर व्हावे लागत असताना उपकेंद्रात प्राथमिक सेवा मिळणे दुरापास्त झालेले आहे. परिणामी डॉक्टर आपल्या दारी म्हणून बोगस डॉक्टरांचे प्रस्थ परिसरात वाढीस आहेत. तापाने फणफणणाऱ्या रुग्णांना बोगस डाक्टरचा आधार दिसत असला तरी अचूक निदानाअभावीे अधिकचा आर्थिक भार पेलण्याची नामुष्की ओढावलेली आहे.विशेषत: गरोदर मातांना उपकेंद्रात सुविधा देवून आर्थिक व शारीरिक .श्रम टाळण्याकरिता प्रसुती सेविकेची नियुक्ती आवश्यक आहे परंतु सेविकेचे पद रिक्त असल्याने नाईलाजास्तव इतरत्र रुग्णालयात संदर्भ सेवा दिल्या जात आहे. उपकेंद्रातील आरोग्य सेवेला संजीवनी देण्याकरिता वरिष्ठांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.या परिसरात शासकीय वैद्यकीय सेवाच नसल्याने बोगस डॉक्टर मोठ्या संख्येने सक्रीय झाले असून ते खासगी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. याबाबत अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई न झाल्याने बोगस डॉक्टरांचे फावत आहे. (वार्ताहर)