शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाटणचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुविधाविनाच

By admin | Updated: September 4, 2014 23:42 IST

जिवती तालुक्यातील पाटण या ग्रामपंचायत असलेल्या गावात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता तीेन दिवसांपासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु झाले आहे. या प्रशिक्षणात सुविधा नसल्याची ओरड

वनसडी : जिवती तालुक्यातील पाटण या ग्रामपंचायत असलेल्या गावात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता तीेन दिवसांपासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु झाले आहे. या प्रशिक्षणात सुविधा नसल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली असून याठिकाणी सुविधा पुरविण्याची व स्थळ बदलवून देण्याची मागणी प्रशिक्षणार्थ्यांनी केली आहे. शासनाने अल्पसंख्याक मुलामुलींना पोलीस भरतीत स्थान प्राप्त व्हावे, याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी व त्याचा फायदा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने माणिकगड पहाडावरील पाटण येथे पहाडावरील एका संस्थेला प्रशिक्षण देण्याचा करार करण्यात आला. त्यासाठी जिल्ह्यातील भद्रावती, गोंडपिंपरी, बल्लारपूर, राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, पोंभुर्णा, नागपूर, कोठारी अशा विविध ठिकाणांवरुन १२८ मुलामुलींंची निवड करण्यात आली. यात आठ मुली व सत्तरच्या आसपास विद्यार्थी येथे दाखल झाले. मात्र येथील व्यवस्था पाहून यातील दहा प्रशिक्षणार्थी दुसऱ्याच दिवशी स्वगावी परत गेल्याची माहिती येथील प्रशिक्षणार्थीनी दिली.या प्रशिक्षणादरम्यान, मुलांची सोय पाटण येथील एका किरायाच्या खोलीत करण्यात आली तर मुलींची सोय एका शाळेत करण्यात आली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वा विजेची सोय नाही. वीज नसल्याने पंख्याचीही व्यवस्था नाही. चार सलग खोल्या असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना झोपण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.डासांचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थ्यांना रात्रभर डासांचा सामना करत जागत रहावे लागते. अंघोळीची सोय नसल्याने एका नाल्यावर जावून त्यांना आंघोळ करावी लागते. नास्ता पोटभर मिळत नाही. जेवणात तीन दिवसांपासून वांग्याची भाजी मिळत असून जेवणाच्या टिफीनमध्ये मुलांना जेवण दिल्या जाते. भाजी असेल तर वरण नाही वरण असेल तर भाजी नाही अशी जेवण्याची व्यवस्था आहे. प्रशिक्षणाकरिता सुसज्य मैदानाची आवश्यकता असते. मात्र येथील मैदानावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शिकवायला प्रशिक्षकाची आवश्यकता आहे. परंतु येथे प्रशिक्षकच नाहीत. सकाळी धावाकरीता पाच किमी अंतरापर्यंत घेवून जातात. कोणत्याही प्रकारची प्रशिक्षण साहित्याची सोय नाही. मुली जिथे राहतात, त्या ठिकाणी मुलीच्या संरक्षणाकरिता कोणतीच सुरक्षा नाही. अशा विविध समस्या प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सोडविण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसांत या समस्या सुटल्या नाहीत, तर हे प्रशिक्षण आम्ही करणार नाही, असा इशारा प्रशिक्षणार्थ्यांनी दिला आहे. याबाबतची माहिती मिळताच कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबीद अली यांनी भेट दिली व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली असता प्रशिक्षणार्थ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याची बाब समोर आली. संस्थेकडे प्रशिक्षण क्षमता नसताना अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करू नये व प्रशिक्षणार्थ्यांचे हाल करून शासनाचीही बदनामी करु नये, असे आबिद अया वेळेस विद्यार्थ्यांना समज घालून याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवून प्रशिक्षणाची गैरसोय व विद्यार्थ्यांची अवहेलना थांबविण्याकरीता निश्चितच जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देवून सुविधा उपलब्ध करून देतील अशी आशा व्यक्त करून प्रशिक्षण स्थळ बदलवून देण्यात यावे अशी मागणी याप्रसंगी केली. याप्रसंगी पाटण येथील कलिमभाई, फारुकभाई, आरिफभाई, असमा उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)