शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

खिशात पास, तरीही विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे सोपे जावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्या सुरू केल्या आहेत.

डोळेझाकग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीलालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे सोपे जावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र या बसगाड्यांमध्ये प्रवाशांचीच जास्त वाहतूक केली जात असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांनाच सीट मिळत नाही. सीट न मिळाल्याने दरवाज्यावर उभी असलेली विद्यार्थिनी धावत्या बसमधून खाली पडल्याची घटना मागील आठवड्यात गांगलवाडी येथे घडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून ‘खिशात पास तरीही जीवघेणा प्रवास’ अशी धोकादायक स्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे. कोरपना तालुक्यातील कोडशी (बु), येरगव्हान, पिपरी, कोठोडा (बु), कारगाव, सावलहिरा, जांभूळधरा, मांडवा, गोविंदपूर, बोरी (नवेगाव), इरई आदी गावांसाठी बससेवा नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायी किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. गडचांदूर येथे अनेक शाळा-महाविद्यालय असल्याने विविध भागातून शेकडो विद्यार्थी व विद्यार्र्थिंनी बसने प्रवास करतात. मात्र एसटी महामंडळाच्या बसेस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत उशीरा पोहोचतात. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. भद्रावती तालुक्यातील ३६ गावांमध्ये अजूनही बससेवा पोहोचली नाही. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ७ किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील गोरजा, कुडरारा, देऊळवाडा, कुनाडा, चिरादेवी, चारू (ख), किन्हाळा, पारोधी, पळसगाव या गावातील विद्यार्थी दररोज पायदळ प्रवास करून शाळेत जातात. चिमूर तालुक्यात मानव विकास अंतर्गत ५७ गावांचा समावेश तर सिंदेवाही तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यासाठी चिमूर आगारातून १४ बस मधून दिवसाला ७१ फे ऱ्यात २ हजार १७६ किलोमीटरची विद्यार्थी वाहतूक केली जाते. मात्र शाळा सुटल्यानंतर सीट पकडण्यासाठी विद्यार्थांची झुंबड उडत असते. तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते. तर तालुक्यातील खंडाळा, झरी, बोडधा, हेटी, टाका, चिचोली, पिंपळगाव, मोटेपार बाघेड, काग, लोहारा, जारेपार, या गावात बससेवा नसल्याने विद्यार्थांना सायकल किंवा इतर साधनांद्वारे शाळेत जावे लागते. ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी आक्सापूर, चांद्रा, डोर्ली, चिचगाव, बारडकिन्ही आदी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागते. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणाकरिता ब्रह्मपूरी, गांगलवाडी, निलज, रूई व आरमोरी यासारख्या ठिकाणी विद्यार्थी जातात. मात्र वेळेवर बससेवा उपलब्ध नाही. जेथे बससेवा आहे तेथे विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जादा बसगाडीची मागणी आहे. मूल तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पडझरी येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या २० विद्यार्थ्यांना ३ किमीचा प्रवास जंगलातून पायी करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना नेहमीच वन्यप्राण्यांची भिती असते. सावली तालुक्यातील करोली, आकापूर हे दोन्ही गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून या दोन्ही गावात आजपर्यंत बससेवा सुरू होवू शकली नाही. या गावातील ३० ते ४० विद्यार्थी इयत्ता ५ ते १२ वी पर्यंत शिक्षणासाठी विहीरगांव येथे जातात. मात्र त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील विद्यार्थी चंद्रपुरात शिक्षणासाठी येतात. मात्र शाळेच्या वेळेत सुटणाऱ्या बसमध्ये इतर प्रवाशांचीच गर्दी राहत असल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गर्दीमुळे विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरल्याच्याही घटना घडल्या आहेत. बस आल्यानंतर अनेक विद्यार्थी सीट पकडण्यासाठी खिडकीतून दफ्तर टाकतात. अशावेळीही अपघात घडले आहेत.