शेतकरी हादरले : ऐन सप्टेंबरमध्येच धोक्याची घंटारत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यातील बोरगाव, सोनुर्ली परिसरातील कपाशीचे उभे पीक करपून वाढून गेल्याची घटना ताजीच असताना नजिकच्या कवठाळा, नांदगाव गावातही कपाशीचे पीक वाळत असल्याने शेतकरी हादरून गेले आहेत. जवळपास ३० ते ३५ एकर जमिनीवरील पीक वाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. व्हायरसच्या प्रभावामुळे पीक वाळत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या कपाशीचे पीक फळावर आले असुन पुढील एक-दोन महिन्यात कापूस वेचणीला सुरूवात होईल. मात्र अचानक आलेल्या या रोगामुळे कपाशीची झाडे वाळायला लागली आहेत. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी केली. पावसाच्या अनियमीतपणामुळे याआधी दुबार पेरणीचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. अश्यातच तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाची काळजी घेत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक वाचविले; परंतु व्हायरसच्या प्रभावामुळे आता सरसकट पिकच वाळायला लागले आहे. बोरगाव, सोनुर्ली गावातही असाच प्रकार दिसुन आला. तेथे प्रमाण अधिक होते. झाड जागीच वाळून गेल्याने काही शेतकऱ्यांनी जमिन वखरून टाकली आहे, तर काही दुबार पेरणीची तयारी करताना दिसत आहे.पावसाची अनियमितता आणि अश्या रोगांची लागण शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. यातच पिके नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत दिली नाही. औषधांच्या वापरांचा दुष्परिणामसीआयसीआर कमिटीच्या तज्ज्ञांनी बोरगाव, सोनुर्ली परिसरातील पिकांची पाहणी करून कपाशीच्या पिकांची तपासणी केली. यामध्ये औषधांचा अधिक वापर आणि काही औषधे एकत्रित करून फवारल्याने पिकावर हा परिणाम झाल्याचे सीआयसीआर कमिटीचे डायरेक्टर केशव क्रांती यांनी स्पष्ट केले होते. काही औषधांची वापरायची मुदत संपल्यानंतरही औषधे वापरल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशाराकोरपना तालुक्यातील बोरगाव, सोनुर्ली, कवठाळा, एकोडी, इरई, नांदगाव परिसरातील कपाशीचे ५०० ते ६०० एकरवरील पिके व्हायरसच्या प्रभावाने नष्ट झाली. एवढे मोठे नुकसान झाले असताना अद्यापही शासन व प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, रमाकांत मालेकर, नीळकंठ कोरांगे, रवी गोखरे, अनंता गोडे, बंडू राजूरकर, नरेश सातपुते यांनी दिला आहेअहवालाला शेतकऱ्यांचा विरोधसीआयसीआर कमिटीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या प्राथमिक अहवालाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. अनेक वर्षांपासून कपाशीचे पीक घेणारे शेतकरी हा अहवाल मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्या मते गावातील एखादा शेतकरी औषधांचा अधिक वापर किंवा चुकीचा वापर करू शकतो अथवा जुनी औषधेही वापरू शकतो. मात्र गावातील सगळेच शेतकरी असा प्रयोग करणार नाहीत. शेतकऱ्यांचे अश्रू झाले अनावरकवठाळा येथील शेतकरी धोंडुजी बोरकुडे यांचे सहा एकरमध्ये असलेले कपाशीचे उभे पीक जागीच नष्ट झाले. पिकासाठी त्यांनी आतापर्यंत १ ते दीड लाखांचा खर्च केल्याचे सांगितले. हे सांगताना शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते. याचबरोबर कवठाळा येथील भाऊराव आगलावे, गोवर्धन बेरड, मधुकर बेरड, विनोद मेवाळकर, श्यामसुंदर कपाडे, अरविंद ठाकरे, रमेश ठाकरे, रवींद्र ठाकरे, कोंडू वरारकर आदी कवठाळा येथील शेतकऱ्यांसह इरई, एकोडी, नांदगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पिक करपून गेले आहे.त्वरित मदत द्या - वामनराव चटपबोरगाव, सोनुर्ली परिसरातील पिकांची वार्ता कळताच शेतकरी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी संपूर्ण परिसर फिरून शेतपिकाची पाहणी केली. सदर परिस्थितीची माहिती त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना दिली. शेतकऱ्यांसह जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
पऱ्हाटी करपली; डोळ्यात दाटली आसवं...!
By admin | Updated: September 13, 2015 00:46 IST