शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या बदलीसाठी पालक शाळेवर धडकले

By admin | Updated: July 23, 2015 00:43 IST

शिक्षिका वर्गात शिकवत नाही, परीक्षा घेतल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून देत नाही, आदी तक्रारी पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात केल्या.

पालकांचा संताप : मुलांना शाळेत जाण्यास रोखलेवरोरा : शिक्षिका वर्गात शिकवत नाही, परीक्षा घेतल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून देत नाही, आदी तक्रारी पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात केल्या. परंतु शिक्षण विभागाने शिक्षिकेवर कारवाई केली नाही. चालु सत्रामध्ये शिक्षिकेची बदली झाली पाहिजे, या मागणीसाठी बुधवारी भटाळा जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक शाळेवर धडकले. आपल्या पाल्यांना शाळेत जाऊ न दिल्याने शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. वरोरा तालुक्यातील भटाळा गावामध्ये जिल्हा परिषद विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता ५ ते ८ वीचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यालयात भटाळा, कोटबाळा, आसाळा, सालोरी आदी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. इयत्ता ८, ९ व १० वीला शिकविणाऱ्या शिक्षिकेने मागील सत्रात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. परंतु उत्तर पत्रिका तपासून दिल्या नाही. त्यामुळे मागील सत्रात इयत्ता ८ वीचा निकाल निकालाच्या दिवशी जाहिर झाला नाही. त्यामुळे सदर प्रकरण पालकांनी शेगाव पोलीस स्टेशन पर्यंत नेले होते. त्यानंतर सदर शिक्षिकेची बदली करावी अशी मागणी केल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाठविला. परंतु सदर शिक्षिकेवर कारवाई झाली नाही. त्यातच यावर्षीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे मागील वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाकडे सदर शिक्षिकेची बदली करण्याची मागणी लेखी स्वरुपात केली. परंतु शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांनी करीत बुधवारी आपल्या पाल्यांना शाळेत जाण्यापासून रोखून संपात व्यक्त केला. जोपर्यंत या शिक्षिकेची बदली करणार नाही, तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिल्या. त्यामुळे यानंतरही प्रकरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बदलीचे आश्वासनपालक शाळेत धडकल्याची माहिती मिळताच वरोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण जि.प. विद्यालय भटाळा येथे पोहचल.े त्यांनी पालकासोबत चर्चा केली. परंतु पालक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेरीस शिक्षणाधिकारी रमाकांत देशपांडे यांनी भ्रमणध्वनीवर पालकांना सदर शिक्षिकेच्या बदलीचे आश्वासन दिले. त्यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी दिली.