शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

पंचायत समितीमध्ये फॉगिंग मशीन धूळ खात

By admin | Updated: October 3, 2015 00:52 IST

डासांना मारण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ब्रह्मपुरीच्या पंचायत समितीला १५ फॉगिंग मशिन दिल्या.

वाटप करण्याकडे दुर्लक्ष : शासनाच्या निधीचा दुरूपयोगब्रह्मपुरी : डासांना मारण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ब्रह्मपुरीच्या पंचायत समितीला १५ फॉगिंग मशिन दिल्या. परंतु गेल्या दोन महिन्यापासून मशिनी नादुरुस्त असल्याने पंचायत समितीच्या गोडाऊनमध्ये धूळ खात पडून आहेत., त्यामुळे शासकीय निधीचा वापर लोकोपयोगी होत नसल्याचे दिसून येत आहे.प्रचंड उष्मा वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजाराची लागण चांदगाव, दुधवाही या खेड्यात होऊन बळी गेल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. पण शासकीय निधीतून दिलेल्या साहित्यांचा वापर होत नसल्याने हे साहित्य शोभेची वस्तू बनून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीना डांसाच्या प्रतिबंध करण्यासाठी फॉगिग मशीनचे वाटप करण्यात आले. परंतु त्या १५ मशिन निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्यांचा उपयोग होत नाही. पर्यायाने पंचायत समितीच्या गोडावून मध्ये त्या मशीन धूळ खात पडलेल्या असल्याने ग्रामपंचायतींना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागाने मशिन कुठे पाठवायचे आहे, याची यादी दिली नाही तसेच त्यांची टेस्टिंग करण्यासाठी अजूनही टेक्निशियन पाठविला नसल्याने १५ मशीन दोन महिन्यांपासून धूळ खात पडल्याने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)