शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पालडोह जि. प. शाळा भरते तब्बल ३६५ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:27 IST

संघरक्षित तावाडे। लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : प्रेमात काहीही घडू शकते असे म्हणतात. असाच प्रकार जिवती तालुक्यात एका शिक्षकाच्या ...

ठळक मुद्देगावकऱ्यांचे सहकार्य : अन् त्या शिक्षकाने सुरू केला नावीन्यपूर्ण उपक्रम

संघरक्षित तावाडे।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : प्रेमात काहीही घडू शकते असे म्हणतात. असाच प्रकार जिवती तालुक्यात एका शिक्षकाच्या बाबतीत घडला आहे. आंतरजातीय प्रेमाला घरच्यांनी आडकाठी आणली. पण, खचून न जाता आयुष्यातील संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसाठी घालविण्याचा संकल्प करून कृतीत उतरविला. मागील पाच वर्षांपासून ही शाळा ३६५ दिवस सुरू आहे. ही प्रेरणादायी घटना आहे जिवती तालुक्यातील पालडोह जि प शाळेची. रविवार असो अथवा कोणताही सण-उत्सव मुले आनंदाने शाळेत येतात. याकरिता गावकरीही मोलाची साथ देत आहेत.पालडोह येथील जि. प. प्राथमिक शाळेत आर. यु. परतेकी हे २००६ रोजी शिक्षक पदावर रूजूझाले. काही वर्षांनंतर शिक्षक परतेकी हे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी. त्यांचे प्रेम जुळले. लग्नासाठी दोघांनीही घरी प्रस्ताव मांडला पण, जात वेगळी असल्याने दोघांना घरून विरोध झाला. त्याचवेळी परतेकी यांनी घर सोडून टेकामांडवा येथेच वर्षभर सुरू लागले. याचवेळी त्यांनी निर्धार केला की वर्षातील ३६५ दिवस शाळे मुलांसोबत घालवणार. हा निर्धार त्यांनी कृतीत उतरविला. पाच वर्षांपासून ही शाळा ३६५ दिवस भरत आहे. पहाटे चार तर रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचा नित्यक्रम सुरू असतो. सकाळी साडेचार वाजता गावाबाहेर जाऊन योगा, व्यायाम व खेळ शिकविल्या जाते. शिकविलेल्या विषयावर दररोज नऊ वाजता विद्यार्थ्यांची चाचणी घेतात. रविवारी वर्ग १ ते ४ व ५ ते ८ या दोन गटात स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन करतात. शाळेत १२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी राबविणाऱ्या परतेकी यांनी नोंदणी विवाह केला. अध्यापनाचे कार्य आता जोमाने सुरू आहे.राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भेटीनवरत्न स्पर्धेत शाळेला दरवर्षी पुरस्कार मिळतात. टेकामांडवा व धोंडामांडवा शिकण्यासाठी शाळेत येतात. खोल्या कमी आहेत. टिनाच्या खाली वर्ग भरविल्या जाते. शाळेला जागा विकत घेण्यासाठी गावकऱ्यांनी २ लाख लोकवर्गणी गोळा केली. कृतीशील उपक्रमांमुळे राज्यातून अनेक शाळेतील विद्यार्थी पालडोह शाळेला भेटी देतात. त्यांच्या स्वागतासाठी गावकरी पुढे येतात. रंगरंगोटी व विविध झाडांनी शाळेचा परिसर देखणा झाला.शाळेत नर्सरी सुरू करण्याचा परतेकी यांनी बोलून दाखविला. शाळेसाठी मैदान नसल्याने तत्कालिन शिक्षक शेंडे व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा प्रश्न दूर केला.प्रशासनाकडून उपेक्षापालडोह येथील जि. प. शाळा १०० टक्के प्रगत आहे. पण, भौतिक सुविधा नाहीत. सुरक्षाभिंत, पाणी, वाढीव वर्ग खोल्यांचा अभाव आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी गावकºयांनी केली.