शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी एफडीसीएमच्या जंगलाला आग

By admin | Updated: April 6, 2015 01:05 IST

वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा परिसरातील जनकापूर ते सामदाकडे जाणाऱ्या वनात मोठ्या

वन्यप्राण्यांना धोका : वनविभाग, एफडीसीएमचे एकमेकांकडे बोटगेवरा: वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा परिसरातील जनकापूर ते सामदाकडे जाणाऱ्या वनात मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. यामध्ये वनविकास महामंडळाची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून परिसरातील वनासह वन्यजीव व जैवविवीधता धोक्यात आली आहे.शासनाच्या वतीने वनविकासाच्या कोट्यावधीच्या योजना वनविकास महामंडळ व नियमित वनविभागामार्फत ग्रामसहभागातून राबविल्या जातात. यासाठी महत्त्वाची भूमिका या विभागांची असते. परंतु वनविकास महामंडळ व वनविभाग यांचे आपापसात सूत जुळत नाही. त्यामुळे कामे प्रभावित होत असल्याने अशाप्रकारच्या धोक्यातून जैवविवीधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांपासून जनकापूर ते सामदा मार्गावरील तीन ते चार किमी अंतरातील जंगल परिसरात मोठा धूर निघताना दिसला. प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता जंगलाला आग लागल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित विभागाला भ्रमणध्वनीवरुन सूचना दिली. परंतु संबंधित विभाग ते आपले क्षेत्र नसल्याचे सांगतात. आता वनविकास महामंडळ व वनविभाग हे परस्पर दोन दिशेने चालणारे विभाग असल्याने अशा घटनाबाबत कुणीही दखल घेण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचेच दिसून येत आहे. आगीमुळे वन्यजीव धोक्यात आले आहे. शिवाय सर्व कृत्रिम पाणवठेही शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. त्यामुळे आगीच्या उष्णतेची दाहकता व उन्हाळ्याच्या उन्हाचा तडाखा वन्यप्राण्यांसाठी त्रासाचा ठरत आहे. (वार्ताहर)