शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मोफत सेवेच्या नावावर रुग्णांची लूट

By admin | Updated: September 21, 2014 23:48 IST

शासकीय रुग्णालयामध्ये शासनामार्फत सहा महिन्यांपूर्वी नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. मात्र सदर रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये किराया द्यावा लागत आहे.

लखमापूर : शासकीय रुग्णालयामध्ये शासनामार्फत सहा महिन्यांपूर्वी नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. मात्र सदर रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये किराया द्यावा लागत आहे. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर ग्रामीण रुग्णालय आणि कोरपना येथे रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. परंतु चंद्रपूर येथे रुग्णांना स्थलांतरीत करण्यासाठी एक हजार २०० ते एक हजार ४०० रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या बीपीएलधारक, दुर्बल घटकातील रुग्णांना ही सेवा मोफत असल्याचे सांगण्यात येते, तर इतर गंभीर रुग्णांसाठी ही सेवा मोफत आहे. मात्र रुग्णांच्या अवस्थेचा फायदा घेत त्यांच्याकडून अधिक पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे शासकीय रुग्णवाहिका नागरिकांसाठी मोफत असताना खासगी वाहनाप्रमाणेच रुग्णांना किराया द्यावा लागत आहे. या तालुक्यात बीपीएलधारकांची संख्या अधिक आहे. तसेच मोलमजुरी करुन जगणारा कामगार, शेतकरी व मजुर वर्गही आहे. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येत नाही. म्हणून शासकीय रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात. यामागे चार पैशांची बचत व्हावी, शिल्लक राहावे अशी अपेक्षा असते. परंतु शासकीय रुग्णालयात अशी लूट सुरु असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. काही रुग्णांनी याविषयी वाहन चालकाला व वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता डिझेलसाठी पैसे कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गंभीर प्रकृती असताना पैशाची पर्वा न करता काही रुग्ण मुकाट्याने हा अन्याय सहन करत आहे. याचाच फायदा घेऊन वाहन चालक रुग्णांकडून वैयक्तिक १०० ते २०० रुपये मागत असल्याचीही चर्चा आहे. शासनामार्फत रुग्णांसाठी अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये विविध आधुनिक सुविधा कोटी रुपये खर्च करुन पुरविण्यात येत आहेत. परंतु योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी व कर्मचारी स्वार्थापोटी सामान्य माणसावर याचा भुर्दंड बसविल्या जात असल्याचे चित्र आहे.गडचांदूर, कोरपना ग्रामीण रुग्णालयात अद्यापही एक्स-रे मशिन, रक्त तपासणी केंद्र आणि खाटांची कमतरता आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी कमी आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)\