शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

राजोली परिसरातील धान रोवणी खोळंबली

By admin | Updated: August 16, 2014 23:24 IST

ऐन रोवणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने या परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत. शेतशिवारातील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्ह व रात्री

राजोली : ऐन रोवणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने या परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत. शेतशिवारातील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्ह व रात्री त्रस्त करणारा उष्मा यामुळे नागरिक हैराण आहेत, तर या विचित्र वातावरणामुळे धान पऱ्ह्यावर अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर फार मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागेल, या विवंचनेत शेतकरी वर्ग चिंताग्रस्त असल्याचे परिसरात चित्र आहे.उत्तम तांदळाचे कोठार व बाजारपेठ म्हणून या परिसराची ओळख आहे. देशात येथील तांदळाला विशेष मागणी आहे. धान रोवणीच्या हंगामात इतर तालुक्यातील शेकडो मजूर या परिसरातील रोवणीच्या कामासाठी वास्तव्यास असतात. अशावेळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मजुरांची उपासमार होण्याची चिन्हे दिसत आहेत. उशिरा पावसाच्या आगमनामुळे काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी चिखल पऱ्हयाद्वारे धानाची रोपे तयार करून रोवणीला सुरवात करण्यात आली. इंजिन व पंपाचा उपयोग करून मिळेल तेथील पाण्याचा उपसा करून रोवण्या साधल्या गेल्या. परंतु आता गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दगा दिल्यामुळे राजोली, डोंगरगाव, गांगलवाडी, चिखली, नवेगाव, ताडकुज, गोलाभूज, मुरमाडी, लोनखैरी आदि शिवारातील धान रोवण्या ठप्प झाल्या आहेत.जलाशयाची स्थिती अतिशय नाजुक असून अत्यल्प पावसाच्या प्रमाणामुळे नदी, नाले, बोड्यात खडखडाट आहे. जिल्ह्यातील मामा तलावात सर्वात मोठा राजोली मामा तलावात फक्त २६ टक्के जलसाठा आहे तर डोंगरगाव ६८ टक्के, गोलाभूज मामा १० टक्के, तांबेगडी मामा १७ टक्के, सायमारा १० टक्के, चिकमारा १७ टक्के, गोलाभूज ल.पा. २८ टक्के, भसबोरण ल.पा. ४८ टक्के पाणी आहे. आजमितीस पावसाची महत्वाची नक्षत्रे कोरडी गेल्याने पिकाच्या भवितव्याची चिंता भेडसावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(वार्ताहर)