शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत व्यवस्थापकाची नियमबाह्य निवड

By admin | Updated: April 14, 2017 00:53 IST

ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत

वाघेडा येथील प्रकार : ग्रामपंचायत सदस्यांचा मनमानी कारभारचिमूर : ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत व्यवस्थापकाची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण राज्यभर सुरू केली आहे. त्या अंतर्गत चिमूर तालुक्यातील वाघेडा गटग्रामपंचायतीच्या आमसभेत शासन निर्णयाची पायमल्ली करीत वायरमन आयटीआयमध्ये जास्त गुण असलेल्या उमेदवाराला डावलून कमी गुण असणाऱ्या उमेदवाराला राजकीय आकसापोटी जवळच्या नातेवाईकांची निवड केल्याचा आरोप अन्यायग्रस्त मंगेश केशव मगरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.ग्रामीण भागातील नागरिक नेहमीच विजेच्या लपंडावाने त्रस्त असतात. लाईनमन ग्रामीण भागात वेळेवर सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. मात्र चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाघेडा येथे विद्युत व्यवस्थापकाच्या निवडीमध्ये गैरप्रकार करून शासन आदेशाला डावलण्यात आले आहे. विद्युत व्यवस्थापकाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार विक्की भाऊराव पाऊलगुडे, मंगेश केशव मगरे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विद्युत व्यवस्थापकाच्या निवडीसाठी ३० मार्चला वाघेडा येथे मासिक सभा घेण्यात आली. यात विक्की भाऊराव पाऊलगुडे यांना इलेक्ट्रिशियन आयटीआयमध्ये फक्त ६५ टक्के गुण मिळाले. तर मंगेश मगरे यांना ६९.४४ टक्के गुण मिळाले. शासन आदेशानुसार मंगेश मगरे हे पात्र उमेदवार होते. परंतु त्यांना डावलण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)