शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे आयोजन

By admin | Updated: December 31, 2015 01:10 IST

भद्रावती येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम ३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत लोकमान्य शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

विविध कार्यक्रम : रोगनिदान व उपचार शिबिर आयुधनिर्माणी (भद्रावती) : भद्रावती येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम ३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत लोकमान्य शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, महिला मेळावा, परिसंवाद स्पर्धा, भजन स्पर्धा, राष्ट्रसंत व्याख्यानमाला, भारुड, कीर्तन, प्रवचन व गोपालकाला इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.३१ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता सप्तखंजरी वादक संदीप पाल व संच यांचे राष्ट्रीय कीर्तन, १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता राष्ट्रसंत व्याख्यानमालेत दारू व व्यसनमुक्ती या विषयावर पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, गुरुकुंज आश्रमचे रवींद्र कुमार, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नवदुर्गा नाटीकेचे सादरीकरण होणार आहे.२ जानेवारीला सकाळी ८.३० वा. विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद स्पर्धा, सकाळी ११ वाजता रोगनिदान व उपचार शिबिर, मुळव्याध, अंडवृद्धी, वात व जनरल ओपीडी डॉ. जगदीश पाटील व संच, आयुर्वेदिक रुग्णालय गुरुकुंज आश्रम यांच्या सहकार्याने होणार आहे. दुपारी १.३० वाजतापासून बालकीर्तनकार साक्षी अतकरे व योगेश प्रधान, पांढरकवडा यांचे राष्ट्रीय कीर्तन, सायंकाळी ६.३० वाजता दिलीप महाराज गव्हाडे व संच अमरावती यांचे भारुड, रात्री ८ वाजता संस्कारक्षम व युवा घडविणारा संगीत एक पात्री नाट्यप्रयोग ‘मी राष्ट्रमाता जिजाऊ बोलतेय’ होणार असून चैताली विजयराव खडी व संच हे नाटाचे सादरीकरण करणार आहेत.३ जानेवारीला कीर्तन, गोपालकाला व चंद्रपूर जिल्हा दारू व व्यसनमुक्ती प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ व २ जानेवारीला बाल, महिला व प्रौढ विभागाची भजन स्पर्धा होत असून त्याकरिता ३६ हजार २६८ रुपयांचे बक्षीस आहे. (वार्ताहर)