शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गोंड समाजाची परंपरा जपण्यासाठी जनगणनेत गोंडी धर्माची नोंद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST

शंकरपूर : पुनेम गोंडी धर्माची स्थापना मुठवापोय पहांदी पारी कुपार लिंगो यांनी केली. अनादी काळापासून या धर्माचे, पुनेमचे ...

शंकरपूर : पुनेम गोंडी धर्माची स्थापना मुठवापोय पहांदी पारी कुपार लिंगो यांनी केली. अनादी काळापासून या धर्माचे, पुनेमचे पालन गोंड जमातीचे गण, सर्व गोंड लोक पालन करीत आहेत. गोंडी धर्म निसर्गाच्या व विज्ञानाच्या तत्त्वाशी जुळलेला आहे. आपली अनोखी परंपरा, नृत्य, सभ्यता, रिवाज जिवंत ठेवण्याकरिता शासनाने दिलेल्या जनगणनेतील धर्माच्या रकान्यामध्ये ‘गोंडीधर्म’ अशी नोंद करावी, असे आवाहन जागतिक गोंड सगा मांदीचे व गोंड समाजाचे अभ्यासक, वक्ते मनोजसिंह गोंड मडावी यांनी केले आहे.

चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे जागतिक गोंड सगा मांदी शाखेच्या वतीने सल्लां गांगरा प्रतिकृतीचे उद्घाटन व गोंडी कोया पुनेम संमेलनाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम आत्राम यांचे हस्ते झाले. व्यासपीठावर ब्रह्मपुरीच्या नगरसेविका अर्चना खंडाते, खिरदास चिकराम, प्रा. विजयकुमार खंडाते, जामनीचे उपसरपंच नानाजी उईके, लक्ष्मण गोंड मडावी, दीपक गोंड कुमरे, छत्रपाल मसराम इंदरशहा मडावी, गजानन कंगाले, शेखर आत्राम, कोलाराचे सरपंच शोभा कोयचाडे, सुनीता सिडाम, आशा आत्राम उपस्थित होते.

गोंडी धर्माचे समाज बांधव, गोंडी ज्या भागात ज्या प्रदेशात वास्तव्यास आहेत. त्या भागातील लोक गोंडी धर्म, पुनेम, सभ्यता, रिवाज, परंपरा, नृत्य, खान पान मोठ्या आदराने आणि अभिमानाने मानतात पाळतात. त्या भागातील जल, जंगल, जमीन, परंपरा अजूनही सुरक्षित आहेत, असे मार्गदर्शनही यावेळी मनोजसिंह गोंड मडावी यांनी केले.

प्रास्ताविक प्रदीप घोडाम, संचालन दिलीपसिंह गोंड, आभार प्रदर्शन कुळमेथे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सूरज वेटे, वैशाली कुळमेथे, बेबी आत्राम, कैलास कुळमेथे, हिवराज सिडाम, माधुरी कंगाले यांनी सहकार्य केले.