शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना रुजू होण्याचे आदेश

By admin | Updated: December 8, 2014 22:33 IST

मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या,

चंद्रपूर: मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या, अन्यथा कडक कार्यवाहीला सामोरे जा, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील काही अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे शालेय पोषण आहार योजनेला ग्रहण लागले. शाळांमधून विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळू लागले. अल्प मानधनावर स्वयंपाकी म्हणून गरजु महिलांना कामावर ठेवण्यात आले. मात्र, काही ठिकाणी आपल्याच मर्जीतील महिलांना कामावर ठेवण्यासाठी खटाटोप झाले. पुढे हा प्रकार वाढतच गेला. दरम्यानच्या काळात, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पोषण आहार योजना चालवण्याचे शासनाने धोरण आणले. याचा फायदा घेत काहींनी पूर्वीपासून कामावर असलेल्या महिलांना डावलून आपल्या मर्जीतील महिलांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अन्यायग्रस्त महिलांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारुन जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु केले. उपोषणाच्या सहाव्या दिवशी चार महिलांची प्रकृती खालावल्यामुळे आयटकचे जिल्हा अध्यक्ष प्रा. कन्नाके, उपाध्यक्ष संतोष दास, विनोद झोडगे, अजय रेड्डी यांनी शिक्षणाधिकारी देशपांडे यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून २९ शाळांतील ४६ महिलांना मानधनासह कामावर रूजू करून घ्यावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)