शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडले

By admin | Updated: June 13, 2014 00:03 IST

वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे उन्हाळा आला की, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दरम्यान, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडण्यात

खांबाडा : वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे उन्हाळा आला की, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दरम्यान, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लालनाला प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने पोथरा नदी वाहू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.दरवर्षी उन्हाळा आला की महिलांची पाण्यासाठी पायपीट होते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने याठिकाणी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षी वाढत्या लोकसंख्येमुळे व गावातील चढउतार भागामुळे पाण्याची कमतरता भासत असते. दरवर्षी उन्हाळा आला की, या परिस्थितीवर कशी मात करावी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडतो. दरवर्षीच महिला ग्रामपंचायतीवर पाणी प्रश्न घेऊन एकजुटीने धडकतात. परंतु ग्रामपंचायतीने पाणी समस्या निपटून काढण्यासाठी आजपर्यंत ठोस असे कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागते.अखेर महिलांनी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेतली. कारण आजपर्यंत या समितीने महिलांच्या प्रश्नाकडे सतत लक्ष देऊन महिलांना न्याय मिळवून दिले आहेत. या अगोदर तंटामुक्त समितीने पुरस्काराच्या रकमेतून दोन वॉर्डामध्ये हातपंप देऊन पाणी समस्या सोडविली आहे. तसेच सन २००९ मध्ये तंटामुक्त गाव समितीच्या पाठपुराव्याने चंद्रपुरचे तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी संबंधित विभागाला संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लाल नाला प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार कोरडी पडलेली पोथरा नदी वाहू लागली होती. बंद पडलेली नळयोजना पुर्ववत सुरू झाली होती. या बाबीची जाण ठेवून महिला समितीने पाणी प्रश्नाबद्दल चर्चा केली. त्यानंतर समितीने पाठपुरावा केल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी लाल नाला प्रकल्पातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)