शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणामुळेच प्रगती शक्य - माळी

By admin | Updated: August 19, 2014 23:37 IST

प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण मिळणे हा आपल्या देशात कायदा असून शिक्षणामुळेच आपली व देशाची प्रगती शक्य असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी व्यक्त केले.

बक्षीस वितरण : विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजनचंद्रपूर : प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण मिळणे हा आपल्या देशात कायदा असून शिक्षणामुळेच आपली व देशाची प्रगती शक्य असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.मातोश्री महाविद्यालय चंद्रपूर येथे झालेल्या या कार्यक्रमास प्राधिकरणाचे सचिव रवींद्र हिवसे, संस्थेच अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र खनके, सचिव रविकांत खनके, सर्व न्यायधीश व विद्यार्थी उपस्थित होते. ही स्पर्धा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने घेण्यात आली. २९ महाविद्यालयातील ६६९ विद्यार्थ्यांचे निबंध प्राधिकरणास प्राप्त झाले. यातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.महाविद्यालयीन विजेत्यामधील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक श्वेता गजानन डाहुले, द्वितीय नेहा शेषराव तामगाडगे आणि तृतीय क्रमांक सिद्धार्थ सुरेश करमरकर यांचा आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक फिजा सत्तार कुरेशी, द्वितीय चारू अविनाश थेरे आणि तृतीय क्रमांक सुरभी अभिमन्यु ठाकुर यांचा आला. इतर विजेत्या विद्यार्थ्यांना भाग्यश्री चंद्रभान तडस, मंजला गोविंदराव चंचल, निकीता करबडे, सिमरण खांडेलकर, वैभवी घरोटे, मयुरी श्रीरामे, अंश अरुण उराडे, नेहा मेश्राम तर विद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्राची जुलमे, श्रद्धा गावंडे, नुजल फातीमा सलीमउद्दीन, पूजा सिंग, मयूर मडावी, वैष्णवी चौधरी, देवाशिष सोनुले, शरयू बडे, श्वेता रामटेके, नजीया शेख, अवदेश राजभर, पूनम झिंगरे, श्रद्धा अवताडे, ऋतुजा घडुले आणि यशोदीप मेश्राम यांचा समावेश आहे. प्रकाश माळी पुढे म्हणाले, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण लोकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहचविण्याचे काम करते. या प्राधिकरणामार्फत शिबिरे आणि अदालत घेण्यात येतात. या कार्यक्रमात रवींद्र हिवशे, अ‍ॅड. रवींद्र खनके व पाहुण्यांची भाषणे झाली.शेवटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक उत्कृष्ट नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या प्राचार्या इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बंडू बिजवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, विद्यालयाचे धर्मपुरीवार, अनिता उमाळे, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)