शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दाखल्यांसाठी करावी लागते २५ किमीची पायपीट

By admin | Updated: September 13, 2015 00:48 IST

राजुरा तालुक्याचे विभाजन करुन शासनाने २००२ मध्ये जिवती तालुक्याची निर्मिती केली. राजुरा व कोरपना तालुक्यातील ८४ गावे जिवती तालुक्यात समाविष्ट करण्यात आले.

गणेरी गावाचा बिकट प्रश्न : गाव एका तालुक्यात; ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यातफारुख शेख  पाटणराजुरा तालुक्याचे विभाजन करुन शासनाने २००२ मध्ये जिवती तालुक्याची निर्मिती केली. राजुरा व कोरपना तालुक्यातील ८४ गावे जिवती तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. विविध समस्यांनी ग्रासलेला जिवती तालुका नेहमीच चर्चेत असतो. तालुका निर्मितीला एका तपाचा कालावधी लोटला असला तरी येथील जनतेच्या समस्या संपलेल्या नाहीत.तेलंगणा सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील वादग्रस्त साडेबारा गावांचा प्रश्न उभा ठाकला असतानाच एक नवीन बाब समोर आली आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात वसलेले गणेरी हे गाव विचित्र समस्येने ग्रासले आहे. या गावाला शैक्षणिक सुविधा म्हणून जिवती तालुक्यातील पंचायत समिती जिवती अंतर्गत १ ते चार वर्ग असलेली जि.प.ची शाळा आहे. सदर गाव राजुरा तालुक्यातील कावळगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येत असून शासकीय योजना गावापासून कोसोदूर आहे. ३० घरांची वस्ती असलेल्या गावात दीडशेच्या आसपास लोकसंख्या असून आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.गावात एकही शौचालय, सिमेंट रस्ता, सिमेंट नाली, अंगणवाडीसाठी इमारत नाही. एक हातपंप असून तोही दोन महिन्यांपासून बंद आहे. पिण्याचे पाणी गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या विहीरवरुन आणावे लागते. ब्लिचिंग पावडर तर गावकऱ्यांना माहितच नाही. दूषित पाणी पिल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील पथदिवे सणासुदीलाच पेटतात. विजेचा लपंडाव व आरोग्याची समस्या गावकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक कुठे व कशी होते हे गावकऱ्यांना माहितच नाही. ग्रामसेवक केवळ घरपावती वसुलीसाठीच येत असल्याची माहिती ८० वर्षीय वृद्ध सखाहरी वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते उघडण्यास गेले असता मतदान ओळखपत्रावरील पुनागुडा ग्रामपंचायतीचा व रहिवासी दाखल्यावरील कावळगोंदी ग्रामपंचायत राजुरा तालुक्याचा उल्लेख असल्याने बँकेत खाते उघडण्यास कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत असते. अशी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखविली. गणेरी गावापासून पाच किमी अंतरावर असलेली पुनगुडा ग्रामपंचायत जिवती पंचायत समिती अंतर्गत आहे व गणेरी गावावरुन पुढे तीन किमी अंतरावरील भाईपठावर हे गाव पुनगुडा ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. मात्र गणेरी हे एकच गाव राजुरा तालुक्यातील कावळगोंदी ग्रामपंचायतीत समाविष्ठ असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावा लागत आहे. याकडे शासनाचे व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.