शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मंडई उरली फक्त बाजार व नाटकापुरती

By admin | Updated: November 9, 2016 02:03 IST

काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागत दिवाळीच्या मुहूर्तावर भरत असलेल्या मंडईमध्ये आता म्हणावा तेव्हढा जीव उरला नाही.

प्रेक्षक घटले : दंडार ग्रामीण लोककलेला ग्रहणतळोधी (बा) : काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागत दिवाळीच्या मुहूर्तावर भरत असलेल्या मंडईमध्ये आता म्हणावा तेव्हढा जीव उरला नाही. मंडईची जगा आता नाटके आणि बाजारांनी घेतली असून भविष्यात या लोककलेचे काय होईल अशी चिंता अनेकांना सतावत आहे.नागभीड लगत असलेल्या नवेगाव, पांडव, कोर्धा, पळसगाव (खुर्द), नांदेड, तळोधी या भागात मंडई उत्सव पार पाडला जातो. या ठिकाणी मंडईमध्ये दंडार मंडळांनी उपस्थितीबाबत जी उदासीनता दाखविल्या जाते ती फार चिंताजनक बाब असल्याचे दिसून येते.एक-दोन वर्षापूर्वी मंडई म्हटले की एक वेगळाच उत्साह असायचा, मंडईमध्ये आपल्या गावच्या दंडार मंडळास भाग घ्यायचा आहे म्हणून १५ दिवस अगोदर पासून दंडारीची तयारी सुरू व्हायची मंडईच्या आदल्या दिवशी रंगीत तालीम म्हणून गावात ‘भडकी दंडार’ सादर व्हायची तत्पूर्वी ज्या गावात मंडईचे आयोजन होते ती आयोजक मंडळी ज्या गावात दंडार मंडळे आहेत अशा गावात जावून मंडळास बुक्का किंवा सुपारी पोचती करायचे. मंडळाने बुक्का किंवा सुपारी स्वीकारली म्हणजे सदर दंडार मंडळ मंडईत भाग घेण्यास कटीबद्ध झाला असे समजण्यात येईल. मंडईच्या दिवशी मंडई उत्सवात किमान दहा ते १५ दंडार मंडळे भाग घेवून परंपरेने चालत आलेल्या लोककलेचे लोकगिताचे ग्रामीण भागात दर्शन घडवत असत. पण हे दिवस आता संपल्यासारखे दिसत आहेत. दंडार मंडळे आता दिसेनाशी झाली आहेत. त्यांची जागा आता केवळ बाजार आणि नाटकांनी घेतली आहे. ज्या गावात मंडईचे आयोजन असते तेथे एक किंवा दोन नाटकांचे आयोजन निश्चित असते. पूर्वीही मंडईच्या दिवशी नाटके होत होती. पण ती गावातील कलावंतांनी तयार केलेले पण हल्ली गावातील नाट्य मंडळेसुद्धा ‘भूमीगत’ झाली आहेत. हल्ली जी नाटके प्रस्तुत होत आहेत ती बाहेरच्या नाट्यसंस्थांची आहेत. काळाच्या ओघात गावातील दंडार आणि नाट्यमंडळे लोप पावत असून ग्रामीण लोककलेच्या दृष्टीने हे निश्चितच घातक आहे. (वार्ताहर)