शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जमाफीसाठी केवळ २० प्रस्ताव

By admin | Updated: July 23, 2015 00:42 IST

नागपूर हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सावकारी कर्जमाफीची घोषणा केली.

कसे मिळणार कर्जमाफीचा लाभ? : कर्जाच्या खाईत असलेले शेतकरी अडचणीतचंद्रपूर : नागपूर हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सावकारी कर्जमाफीची घोषणा केली. ३० जूनपर्यंत अहवाल सादर करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या. मात्र आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीकडे केवळ सिंदेवाही तालुक्यातील २० प्रस्ताव सादर झाले आहेत. त्यामुळे उर्वरित तालुक्यात सावकराच्या कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना भोपळा मिळण्याची शक्यता बळावली आहे. सावकरी कर्जमाफीचे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे सादर झाल्यानंतर ही समिती अभिप्राय देऊन जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवित असते. त्यानंतर त्या प्रस्तावावर चर्चा होऊन प्रस्ताव निकाली काढले जाते. मात्र आतापर्यंत केवळ सिंदेवाही तालुक्यातील २० प्रस्ताव सादर झाले असून यापैकी १६ प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. प्रस्ताव सादर झालेल्या २० शेतकऱ्यांकडे १ लाख ८२ हजार रूपयांचे सावकारी कर्ज होते. त्यावर १६ हजार ९१९ रूपये व्याज झाले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत १६ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यात शेतकऱ्यांचे कर्जाचे १ लाख ४१ हजार रूपये व व्याज १३ हजार ५८२ रूपये माफ होणार आहे. तर ४ प्रस्ताव त्रुटीमुळे परत पाठविण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सावकारी कर्ज घेणारे शेतकरी कर्ज माफीस पात्र ठरणार आहेत, अशा शेतकऱ्यांचा अहवाल तालुका उपनिबंधकाकडे सादर करायचा होता. मात्र जिल्ह्यातील अनेक सावकारांनी अहवाल सहकार विभागाकडे सादर करण्यास दिरंगाई केली आहे. न्यायालयात याचिका दाखल असल्याने सावकारांवरही दडपण आणता येऊ शकत नाही. तर कर्जमाफीसाठी शासनाने काही अटी घातल्याने ही प्रक्रीया लांबणीवर जात आहे. हिवाळी अधिवेशन काळात कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याचा अद्यादेश राज्य शासनाने काढला. ३० जूनपुर्वीच कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात मात्र या निर्णयाची अंमलबजावनीच झाली नाही. यामुळे पेरणी तोंडावर असली तरी सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तू परत मिळाल्याच नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. ३० आॅगस्टपर्यत प्रस्ताव सादर करता येणार असून तालुकास्तरीय समितीकडून आलेल्या प्रस्तावावर जिल्हास्तरीय समिती निर्णय घेईल.- राजेंद्र कौसडीकरजिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था चंद्रपूर.